पुणे जिल्ह्यावरील राजकीय वर्चस्वावरून अजित पवार आणि भाजपच्या स्थानिक लोकप्रतिनिधींमध्ये जणू राजकीय चढाओढ लागल्याची जिल्ह्यात चर्चा आहे. अजित पवारांनी पालकमंत्री पदाची सूत्र हाती घेतल्यानंतर विकासनिधी वाटपात डावललं जात असल्याचा आरोप पुणे जिल्ह्यातील भाजपच्या लोकप्रतिनिधींनी केला होता. त्यावर स्पष्टीकरण देताना अजित पवारांनी निधी वाटपाच्या सूत्राचा चेंडू भाजपच्या कोर्टात टोलावला आहे.
शिवसेनेची तयारी; भाजपही इच्छुक, कोकणावरून महायुतीत राजकीय धुमशान होणार?
advertisement
'हे तीन पक्षांचं सरकार आहे. वेगवेगळ्या पक्षाकडे जिल्ह्यांची पालकमंत्रीपदं आहेत. मी तीन चार महिन्यांपूर्वी पालकमंत्री झालो. सोलापूरला राधाकृष्ण विखे पाटलांनी जे सूत्र ठरवलं होतं, तशाच पद्धतीचं सूत्र आपण इथे ठरवलं,' असं म्हणत अजित पवारांनी भाजपकडेच बोट दाखवलं.
अजित पवार पालकमंत्री होण्यापूर्वी भाजपच्या चंद्रकांत पाटलांकडे पुणे जिल्ह्याचं पालकमंत्री पद होतं. अजित पवारांच्या शिंदे सरकारमधील प्रवेशाच्या काही दिवस आधी चंद्रकांत पाटलांनी पुणे जिल्हा नियोजन समितीची बैठक घेती होती.त्यामध्ये विविध विकास कामांना त्यांनी आर्थिक निधी देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र त्या बैठकीला सहा महिन्यांचा कालावधी उलटून गेल्यावरही चारेशे कोटींच्या विकास कामांना अद्याप मंजुरी देण्यात आली नाही. काही दिवसांपूर्वी हा वाद मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे गेला होता. पण त्यानंतरही वादावर तोडगा निघू शकला नाही. या पार्श्वभूमीवर नुकतेच जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत भाजपच्या सदस्यांनी अजित पवारांविरोधात नाराजीचा सूर अळवला होता.
अजित पवारांनी विखे पाटलांचं नाव घेतल्यानंतर आता खुद्द विखे पाटलांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे. 'आपण एकाच सरकारमधे आहोत, निधीवरून असे तंटे निर्माण होणे योग्य नाही. दोन्ही ज्येष्ठ नेते आहेत, त्यांनी बसूनच निर्णय केले पाहिजेत. याचा परिणाम पक्षाच्या कामावर, स्थानिक लोकप्रतिनिधींवर होतो', असं राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले.
सोम्या-गोम्या वरून जुंपली, अजितदादांच्या टीकेवर संजय राऊतांचा पलटवार