Loksabha Elections 2024 : शिवसेनेची तयारी; भाजपही इच्छुक, कोकणावरून महायुतीत राजकीय धुमशान होणार?
- Published by:Shreyas
Last Updated:
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावरून महायुतीत मोठा वाद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शिवसेनेच्या मतदारसंघात भाजपनं सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाणांना उतरवण्याची तयारी सुरू केली आहे.
मुंबई : रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावरून महायुतीत मोठा वाद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शिवसेनेच्या मतदारसंघात भाजपनं सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाणांना उतरवण्याची तयारी सुरू केली आहे. तर शिवसेनेचे किरण सामंत आधीपासूनच तयारीत असल्याने कोण माघार घेणार? असा प्रश्न निर्माण झालाय. दरम्यान, आधी आक्रमक भूमिका घेणाऱ्या किरण सामंतांनी नंतर समन्वयाची भूमिका घेतली आहे.
रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघावरून कोकणात महायुतीत धुमशान सुरू झालंय. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी त्यांचे बंधू किरण सामंत शिवसेनेच्या तिकीटावर लढणार असल्याचं आधीच जाहीर केलंय. किरण सामंत यांनीही किरण सामंताला रोखणार कोण? असा थेट इशारा स्टेटसच्या माध्यमातून विरोधकांना दिला. वर्षानुवर्ष युतीत या मतदारसंघातून शिवसेनेनं विजय मिळवला, मात्र आता रवींद्र चव्हाणांच्या रूपानं तगडा उमेदवार उतरवून भाजपचा झेंडा रोवण्याची तयारी सुरू झाली आहे, त्यामुळे शिवसेनेच्या गोटात दाणादाण उडाली आहे. मात्र जागा सोडणार नसल्याचंही शिवसेनेनं निक्षून सांगितलं.
advertisement
शिवसेनेच्या गोटात चिंतेचं वातावरण निर्माण झालेलं असल्यामुळे सुधीर मुनगंटीवार यांनी टेन्शन हलकं करण्याचा प्रयत्न केला. जागावाटपाबाबत कोणताही निर्णय झाला नसल्याचं मुनगंटीवार यांनी सांगितलं. महायुतीत वाद सुरू झाल्यानं शिवसेना ठाकरे गटानं तत्परतेनं त्यात तेल ओतण्याचा प्रयत्न केला. महायुतीत असंच होणार हे आधीच सांगितलं होतं, याची आठवण अरविंद सावंतांनी करून दिली.
advertisement
मुहायुतीतील शिवसेनेनं रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघावर कोणतीही तडजोड करणार नसल्याचं स्पष्ट केलंय. भाजपनंही या मुद्यावर सावध प्रतिक्रिया दिलीय. त्यामुळे तळकोकणात मोठ्या प्रमाणात राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता आहे.
Location :
Ratnagiri,Maharashtra
First Published :
January 01, 2024 8:15 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Loksabha Elections 2024 : शिवसेनेची तयारी; भाजपही इच्छुक, कोकणावरून महायुतीत राजकीय धुमशान होणार?