TRENDING:

Junnar Accident: काळूबाईच्या दर्शनावरून परतताना महिला भाविकांच्या गाडीला अपघात, पिकअप पलटला

Last Updated:

जुन्नर तालुक्यातील पिंपळगाव जोगे परिसरातील महिला पिकअप गाडीतून तळेरान येथील काळूबाई देवीच्या दर्शनाला गेल्या होत्या.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
सचिन तोडकर, प्रतिनिधी, जुन्नर (पुणे): मांढरदेवीच्या काळूबाई देवीच्या दर्शनावरून परतत असताना जुन्नर तालुक्यातील तळेरान येथील भाविक महिलांचा पीकअप उलटून अपघात झाला. अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला असून जवळपास १५ महिला जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.
ओतूर अपघात
ओतूर अपघात
advertisement

जुन्नर तालुक्यातील पिंपळगाव जोगे परिसरातील महिला पिकअप गाडीतून तळेरान येथील काळूबाई देवीच्या दर्शनाला गेल्या होत्या. दर्शन घेऊन परतत असताना शिंदळदरा परिसरातील वळणावर पिकअप गाडी सुमारे दहा फूट रस्त्याच्या खाली पलटी झाली.

या अपघातात कविता विठ्ठल गवारी या ३५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला असून १३ ते १५ जण जखमी झाले आहेत. अपघातातील जखमींवर आळेफाटा येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

advertisement

मंगळवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास पिंपळगाव जोगे परिसरात महिलांच्या गाडीला अपघात झाला. लोहकरवाडी, गवारवाडी आणि वाघ्याचीवाडी येथील काही महिला काळूबाईचे दर्शन घेण्याकरिता मांढरदेवीला गेल्या होत्या. परतत असताना पिंपळगावदरम्यान गाडीला अपघात झाला. पिकअप उलटून एका महिलेचा मृत्यू झाला, अशी माहिती ओतूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक एल जी थाटे यांनी दिली.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Junnar Accident: काळूबाईच्या दर्शनावरून परतताना महिला भाविकांच्या गाडीला अपघात, पिकअप पलटला
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल