प्रभाग क्रमांक ३० मधील क वॉर्डमध्ये घड्याळ विरुद्ध तुतारीचे उमेदवार एकमेकांसमोर
पुणे महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ३० मधील क वॉर्डात घड्याळ विरुद्ध तुतारीचे उमेदवार एकमेकांसमोर उभे आहेत. अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून निवेदिता जोशी तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून मनीषा शितोळे या निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
प्रभाग 30: कर्वेनगर- हिंगणे होम कॉलनी
-भाजप
सुशील मेंगडे, रेश्मा बराटे, तेजश्री पवळे, राजाभाऊ बराटे
advertisement
-राष्ट्रवादी काँग्रेस (राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट)
स्वप्निल दुधाने, संगीता बराटे, निवेदिता जोशी, विजय खळदकर
-शिवसेना (एकनाथ शिंदे गट)
विनोद मोहिते, मानसी गुंड, प्रतीक्षा जावळकर, प्रणव थोरात
-राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)
मनिषा शितोळे
-काँग्रेस-शिवसेना
सुनीता सरगर, वैशाली दिघे
काही ठिकाणी अर्ज माघारी घेतले, काही ठिकाणी राहिले
आघाडीचा निर्णय जाहीर करायला वेळ लागल्याने दोन्ही बाजूकडील काही उमेदवारांनी अर्ज दाखल केले. माघारीसाठीही काही ठिकाणी चर्चा केल्या. अनेकांनी अर्ज माघारी घेण्याची दर्शवली. परंतु काही ठिकाणी ठराविकांनी अर्ज ठेवले आहेत. परंतु राष्ट्रवादीकडून उमेदवारांची यादी जाहीर झाली आहे. त्यांनाच अधिकृत उमेदवार मानण्यात यावे, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पिंपरी चिंचवडमध्ये बोलताना दिली.
भाजपला नमविण्यासाठी अजित पवार-शरद पवार एकत्र
पुणे आणि पिंपरी चिंचवड हा खरे तर राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला. २०१७ साली भारतीय जनता पक्षाने राष्ट्रवादीकडून दोन्ही शहरे हिसकावून घेतली. पुण्यात मुरलीधर मोहोळ आणि संजय काकडे यांच्या परिश्रमाने आणि पिंपरी चिंचवडमध्ये भाजप नेत्यांच्या एकीने भाजपने दोन्ही महापालिकांवर झेंडा फडकवला. आता तब्बल आठ वर्षांनी निवडून होत असून गेलेला बालेकिल्ला पुन्हा मिळविण्यासाठी अजित पवार यांनी तडजोड करीत शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला सोबत घेऊन भाजपला नामोहरण करण्याचा चंग बांधला आहे.
