पुणे, 4 डिसेंबर : पुण्यातल्या ऐतिहासिक भिडे वाड्याचा ताबा महापालिकेने पोलीस बंदोबस्तात घेतला आहे. भाडेकरूंना खाली करून वाड्याच्या चारही बाजूने पत्रे ठोकले जात आहेत. मुलींची देशातील पहिली शाळा ज्या भिडे वाड्यात सुरू झाली होती, तो वाडा आता सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने पुणे महानगरपालिका जमीनदोस्त करणार आहे, यामुळे महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकाचा मार्ग मोकळा होणार आहे.
advertisement
मागच्याच महिन्यात भिडे वाड्यातल्या सर्व भाडेकरूंची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावली होती. महिन्याभरात पोट भाडेकरूंनी भिडे वाड्याचा ताबा सोडला नाही, तर पालिकेने बळाचा वापर करून वाडा ताब्यात घ्यावा, असा आदेशही सुप्रीम कोर्टाने दिला होता. त्यानंतर आता पुणे महापालिकेने भिडे वाड्याचा ताबा घेत आहे. भिडे वाडा जमीनदोस्त करून तिथे आता आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्मारक उभारलं जाणार आहे.
महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले या दाम्पत्याने मुलींची पहिली शाळा 1 जाने 1848 रोजी पुण्यात बुधवार पेठेत भिडे यांच्या वाड्यात सुरु केली होती.
