बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरच्या पुण्यातील अपार्टमेंटच्या भाडेकरूंनी भाडे करारातील अटी पाळल्या नाहीत, असा आरोप करून त्याच्यावर दावा दाखल केला होता. हा दावा ठोकणारी महिला दुसरी तिसरी कोणी नसून शितल तेजवानी होती.
थेट रणबीरवर नुकसानभरपाईचा दावा
रणबीर कपूरचा पुण्यातील ट्रम्प टॉवर्समध्ये फ्लॅट आहे. शीतल तेजवानीने करारात नमूद केलेल्या लॉक-इन कालावधीच्या आधीच घरातून काढून टाकण्यात आल्याबद्दल नुकसानभरपाई आणि त्यावर व्याजाची मागणी केली. हा दावा पुणे दिवाणी न्यायालयात दाखल करण्यात आला असून तेजवानी ने ५० लाख रुपयांची नुकसानभरपाई मागितली आहे. या प्रकरणाबाबत सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांनी ट्विट केले आहे.
advertisement
रणबीर कपूरला कदाचित हे देखील माहित नसेल की शीतल तेजवानी किती दिवाणी प्रकरणांमध्ये अडकली आहे. तिला भूमाफिया आणि राजकारण्यांचा भक्कम पाठिंबा आहे. ही तीच शीतल एस. सूर्यवंशी (तेजवानी) आहे जिने २०१८ मध्ये ट्रम्प टॉवर्स फ्लॅटसाठी रणबीरवर ५०.४० लाख रुपयांचा दावा केला. हा खटला अजूनही प्रलंबित आहे, असे विजय कुंभार ट्विटमध्ये म्हणाले आहेत.
शीतल तेजवानीवर आरोप काय?
महाराष्ट्र शासनाच्या नावावर नोंद असलेल्या महार वतनाच्या जमिनीच्या खरेदी विक्री व्यवहारासाठी शीतल तेजवानी यांनी खोटी कागदपत्रे तयार केल्याचा आरोप आहे. शीतल तेजवानी आणि मूळ मालक गायकवाड कुटुंब आरोपांच्या घेऱ्यात आहे. शीतल तेजवानी ही जमीन गैरव्यवहारातील बडा मासा आहे.






