उत्तर प्रदेश सरकारचा 'बुलडोझर पॅटर्न' देशभरात गाजत असताना पुणे पोलिसांनीही शहरातील गुन्हेगारांचे कंबरडे मोडण्यासाठी आर्थिक स्त्रोतांवर घाव घालण्याचे ठरवले आहे. मकोका सारख्या गंभीर गुन्ह्यात किंवा तत्सम मोठ्या गुन्ह्यात अटकेत असलेल्या गुन्हेगारांच्या नांग्या ठेचण्यासाठी पुणे पोलिसांनी त्याचे कुटुंब, त्याला आधार देणारे लोक आदींवर कारवाईचा बडगा उगारला आहे.
बंडू आंदेकरचे अवैध बांधकाम जमीनदोस्त, बुलडोझर चालवला
advertisement
पुण्यातील गणेश पेठेत बंडू आंदेकर याने अवैध मार्गाने पैसे जमवून अनधिकृत बांधकाम केले आहे. हेच बांधकाम पुणे पोलिसांनी आज जमीनदोस्त केले. यावेळी मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला होता. ही कारवाई करून गुन्हेगारांचे आर्थिक कंबरडे मोडण्याचे इरादे पुणे पोलिसांनी स्पष्ट केले.
पोलिसांनी काय काय उद्ध्वस्त केले?
आयुष गणेश कोमकर हत्या प्रकरणातील आरोपी सूर्यकांत ऊर्फ बंडू आंदेकर याच्या घराचे समोरील आणि आसपास त्याने व त्याच्या कुटुंबियांनी उभारलेले अनधिकृत घर, पत्रा शेड, शौचालय हे पुणे महानगरपालिका तसेच पोलिसांनी बंदोबस्तात पाडून टाकले.
पाडलेले क्षेत्र-
525 स्केअर फूट पत्रा शेड
525 स्केअर फूट पक्के बांधकाम
100 स्केअर फूट पत्रा शेड
100 स्केअर फूट पक्के बांधकाम
50 स्केअर फूट पत्रा शेड
50 स्केअर फूट पक्के बांधकाम
200 स्केअर फूटचे एकूण 08 पक्के बांधकाम असलेले शौचालय
बंडू आंदेकर कोण आहे?
बंडू आंदेकर हा आंदेकर गुन्हेगारी टोळीचा प्रमुख आहे
त्याच्या नावावर खून, खंडणी आदी गंभीर गुन्हे दाखल आहेत
अतिशय क्रूर पद्धतीने गुन्हा करणारा गुन्हेगार म्हणून बंडू कुप्रसिद्ध आहे
बंडू आंदेकर याच्यावर नातू आयुष कोमकरची हत्या केल्याचा आरोप आहे
गुन्हेगारीच्या माध्यमातून त्याने अमाप माया जमवली