TRENDING:

राहातामध्ये विरोधकांचा सुफडा साफ, विखे पाटलांनी राखला गड, वाचा संपूर्ण निकाल

Last Updated:

Rahata Nagar Palika Election Result 2025: अहिल्यानगर जिल्ह्यातील राहता तालुका हा भाजपचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा बालेकिल्ला समजला जातो. विखेंना आपला गड राखता आला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
Rahata Nagar Palika Election Result 2025: अहिल्यानगर जिल्ह्यातील राहता तालुका हा भाजपचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा बालेकिल्ला समजला जातो. इथं अनेक वर्षांपासून विखे पाटलांची सत्ता आहे. विखे पाटील कोणत्याही पक्षात राहिले तरी इथं कायमच विखे पाटील यांच्या मर्जीतील लोक निवडून येतात. आता पुन्हा एकदा विखे पाटलांनी राहाताचा गड राखला आहे. राहाता नगर पालिका निवडणुकीत विखेंनी विरोधकांचा सुफडा साफ केला आहे.
News18
News18
advertisement

राहाता नगरपालिकेत एकूण २० जागांसाठी मतदान पार पडलं होतं. इथं भाजप आणि शिवसेना शिंदे गटाने युतीतून निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत भाजप आणि सेनेचे १९ नगरसेवक निवडून आले आहेत. नगराध्यक्षपदी देखील भाजपचे स्वाधीन गाडेकर बहुमताने विजयी झाले आहेत.

खरं तर, नगर जिल्ह्यात बाळासाहेब थोरात आणि राधाकृष्ण विखे पाटील यांच्या गटात कायमच रस्सीखेच सुरू असतो. लोकसभा निवडणुकीत राधाकृष्ण विखे पाटलांचे पूत्र आणि माजी खासदार सुजय विखे पाटील पराभूत झाले होते. इथून शरद पवार गटाच्या निलेश लंकेंना निवडून आणण्यासाठी बाळासाहेब थोरातांनी संपूर्ण ताकद लावली होती. लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाचा वचपा विखे पाटलांनी संगमनेर विधानसभेत काढला होता. इथं बाळासाहेब थोरातांचा मोठा पराभव झाला होता.

advertisement

त्यामुळे यंदाची राहाता नगरपालिकेची निवडणूक अनेक अर्थांनी महत्त्वपूर्ण ठरत होती. विधानसभेच्या पराभवाचा बदला इथं घेतला जाईल, अशी शक्यता बोलली जात होती. मात्र विखे पाटलांनी आपला गड राखला आहे. राहत्यामधील २० पैकी १९ जागांवर भाजप- सेनेचे नगरसेवक निवडून आले आहेत. तर नगराध्यक्षपदी भाजपचे स्वाधीन गाडेकर बहुमताने विजयी झाले आहेत.

नेवासा नगर पंचायत निकाल

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
मक्याच्या दरात मोठी घसरण, शनिवारी सोयाबीन आणि कांद्याला किती मिळाला दर?
सर्व पहा

दुसरीकडे, नेवासा नगर पंचायत निवडणुकीत गडाखांनी बाजी मारली आहे. त्यांचे नगरसेवक जास्त निवडून आणले असले तरी त्यांचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार हरला आहे. त्यामुळे नेवासामध्ये गडाखांचा गड आला पण सिंह गेला, अशी स्थिती निर्माण झाली आहे. नेवासात 17 पैकी 10 जागा गडाखांच्या शेतकरी क्रांतीकारी पक्षाला मिळाल्या आहेत. तर 6 जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी झाले आहेत.एका जागेवर अपक्षांनी बाजी मारली आहे. मात्र नगराध्यक्ष पदी महायुतीचे डॉ करण सिंग घुले विजयी झाले आहेत. हा गडाखांना मोठा धक्का मानला जात आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
राहातामध्ये विरोधकांचा सुफडा साफ, विखे पाटलांनी राखला गड, वाचा संपूर्ण निकाल
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल