TRENDING:

राहुल गांधी म्हणाले, "मोदीजी, 5 कोटी टेम्पोतून कोणी पाठवले? तावडे म्हणतात "नालासोपाराला या...

Last Updated:

काँग्रेस आणि भाजपमध्ये आरोप- प्रत्यारोपाच्या फैरी सुरू झाल्या आहेत. मोदीजी, हे पाच कोटी कोणाच्या तिजोरीतून आले?'असा सवाल राहुल गांधींनी केला.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
विरार : भाजपचे केंद्रीय सरचिटणीस विनोद तावडे (Vinod Tawde)  यांना बहुजन विकास आघाडीच्या ठाकुरांना हॉटेलमध्ये घेरून पैसे वाटप केल्याच आरोप केला आहे. या आरोपासह ठाकुरांनी विनोद तावडे यांना हॉटेलमध्ये घेरलं होतं. तब्बल तीन तास विरारच्या हॉटेलमध्ये हा संपूर्ण राडा सुरू होता. या संपूर्ण प्रकाराची फक्त महाराष्ट्रात नाही तर दिल्लीपर्यंत चर्चा झाली आहे. या आरोपानंतर काँग्रेस आणि भाजपमध्ये आरोप- प्रत्यारोपाच्या फैरी सुरू झाल्या आहेत. मोदीजी, हे पाच कोटी कोणाच्या तिजोरीतून आले?'असा सवाल राहुल गांधींनी केला. या राहुल गांधींच्या सवालावर विनोद तावडेंनी प्रत्युत्तर दिले आहे.
News18
News18
advertisement

राहुल गांधी यांनी एक्सवर (पूर्वीचे ट्वीटर) व्हिडीओ विरारच्या विवांता हॉटेलमधील सकाळच्या राड्याचा व्हिडीओ शेअर केला आहे. राहुल गांधी म्हणाले, ‘मोदीजी, हे 5 कोटी कोणाच्या तिजोरीतून आले आहेत. जनतेचा पैसा लुटून तो टेम्पोतून तुम्हाला कोणी पाठवला?

त्यावर राहुल गांधींच्या टीकेला तावडेंकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे. विनोद तावडे म्हणाले 'राहुल गांधी तुम्ही स्वतः नालासोपारा येथे या, हॉटेलचे सीसीटीव्ही फुटेज बघा, तेथील निवडणूक आयोगाची संपूर्ण कार्यवाही बघा आणि पैसे कसे आले हे सिद्ध करा. कोणतीही माहिती नसताना अशा प्रकारचं वक्तव्य करणं म्हणजे पोरकटपणाचं लक्षणं असंही विनोद तावडे म्हणाले.

advertisement

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
हॉटेलसारखी बिर्याणी घरीच बनवा, ही पद्धत आजपर्यंत कुणीच सांगितली नसेल! Video
सर्व पहा

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
राहुल गांधी म्हणाले, "मोदीजी, 5 कोटी टेम्पोतून कोणी पाठवले? तावडे म्हणतात "नालासोपाराला या...
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल