मिळालेल्या माहितीनुसार रायगडच्या दिवेआगर बोर्ली मार्गावर हा मारूती कार आणि बाईक प्रवास करत होते. या दरम्यान बाईकवरून एक दाम्पत्य प्रवास करत होते, तर कारमध्ये चालक व्यतिरीक्त कोण प्रवास करत होतं याची माहिती मिळू शकली नाही आहे.पण दोन्ही वाहनांचा अपघात झाल्यानंतर कार चालकाने दुचाकीला फटफटत नेले होते.यामध्ये मोहम्मद हनीफ अजहर बेगी या बाईकस्वाराचा मृत्यू झाला होता. तर त्यांची बायको या अपघातातून सुदैवाने बचावल्या होत्या. त्यामुळे त्यांनी संपूर्ण घटना आपल्या डोळ्यांनी पाहिली होती.
advertisement
या घटनेनंतर स्थानिकांनी कार चालकाची गाडी अडवून दिघी सागरी पोलिसांना या घटनेची माहिती दिली होती. त्यानुसार दिघी सागरी पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे. तसेच कार चालकाला ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी आता तक्रारीवरून कार चालकावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.या घटनेनंतर मात्र स्थानिक नागरीक प्रचंड आक्रामक झाले आहेत आणि या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
