TRENDING:

Raj Thackeray: मतदार यादी घोळावरून राज ठाकरे आक्रमक, थेट निवडणूक आयोगाला चॅलेंज, '...तोपर्यंत निवडणुका घेऊनच दाखवा'

Last Updated:

Raj Thackeray Challege to Election Commission : मनसे अध्यक्षांनी मतदार यादीवरून थेट निवडणूक आयोगाला आव्हान दिले आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई: आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज मुंबईतील गोरेगाव येथील नेस्को मैदानात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. मतदारयादी घोळाच्या पार्श्वभूमीवर हा मेळावा होत आहे. या मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणाचा व्हिडीओ दाखवत भाजपला सवाल केला. तर, दुसरीकडे मनसे अध्यक्षांनी मतदार यादीवरून थेट निवडणूक आयोगाला आव्हान दिले आहे. मतदारयादीबाबतचे आक्षेप दूर होत नाही तोपर्यंत निवडणुका होता कामा नये असे राज ठाकरे यांनी म्हटले.
राज ठाकरेंचे निवडणूक आयोगाला चॅलेंज, '...तोपर्यंत निवडणुका घेऊनच दाखवा'
राज ठाकरेंचे निवडणूक आयोगाला चॅलेंज, '...तोपर्यंत निवडणुका घेऊनच दाखवा'
advertisement

राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात म्हटले की, स्थानिक पक्ष संपवून टाकण्याचा प्रयत्न सुरू आहे. माझ्याकडे आलेल्या खात्रीशीर माहितीनुसार, जवळपास 96 लाख मतदार यादीत घुसवले आहेत. प्रत्येक शहरात लोकं घुसवले आहेऱ् असे होणार असेल तर कश्यासाठी घेता, कशासाठी मतदार घेता. तुम्ही मतं द्या, नाही तर नका देऊ मॅच फिक्स असल्याचा आरोप राज ठाकरे यांनी केला. हे कोणत्या ना कोणत्या प्रकारचे नाकारचे षडयंत्र आहे ही कोणत्या प्रकारची निवडणूक आहे. जर मतदार याद्या सेट असतील तर तुम्ही मतदान करा नाही तर नका करू, याकडे ही राज ठाकरे यांनी लक्ष वेधले.

advertisement

राज ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधताना म्हटले की, मी निवडणूक आयोगावर बोलतो तर तुम्हाला का जळतय. मला कळत नाही सत्ताधारी पक्षाची लोकं का चिडत आहेत. हीच माणसं जेंव्हा विरोधी बाकावर गेले तेंव्हा हेच बोलत होते. राज ठाकरे यांनी विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे 2014 च्या निवडणूक प्रचारातील भाषण दाखवले. या भाषणात नरेंद्र मोदी यांनी निवडणूक आयोगावर शंका उपस्थित करत सवाल केले होते.

advertisement

निवडणुका घेऊनच दाखवा...

राज ठाकरे यांनी मुंबई वेगळी करण्याचा कट असल्याचा आरोप केला. राज यांनी म्हटले की, संयुक्त महाराष्ट्राचा लढा उभारला गेला. मुंबई महाराष्ट्राला देता कामा नये अशी भूमिका घेणारे सरदार वल्लभभाई पटेल होते. हे सगळं सुरू आहे ते हे मुंबई ताब्यात मिळवण्यासाठी सुरू आहे. आपली जमीन एकदा हातातून गेली की मग परत येत नाही. माझ्या महाराष्ट्रातील सर्व मतदारांना सांगणे आहे की सजग राहा असे राज यांनी म्हटले.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
ऐन दिवाळीत मका अन् कांद्याचे दर कोसळले, सोयाबीनला आज काय मिळाला भाव? Video
सर्व पहा

निवडणूक आयोगाला इशारा देताना राज ठाकरे यांनी म्हटले की, जोवर मतदार यादी स्वच्छ होत नाही तोवर निवडणूका घेऊन दाखवाच. शांततेत मतदान पार पाडायचे आहे तर योग्य पद्धतीने निवडणुका झाल्या पाहिजेत. सगळ्याच राजकीय पक्षांच्या शंकांचे निरसन झाले पाहिजे. सत्तेत कोणी का येईल, त्यांच्याशी मला घेणेदेणे नाही पण जे मतदान होईल ते प्रामाणिकपणे झाले पाहिजे अशी माझी भूमिका असल्याचे राज ठाकरे यांनी म्हटले.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Raj Thackeray: मतदार यादी घोळावरून राज ठाकरे आक्रमक, थेट निवडणूक आयोगाला चॅलेंज, '...तोपर्यंत निवडणुका घेऊनच दाखवा'
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल