TRENDING:

Raj Thackeray : 'पुन्हा बांबू लावला तर सगळ्यांच्या बांबू लावेन', टोलनाक्यावर उतरून राज ठाकरेंचा इशारा, Video

Last Updated:

टोलनाक्याच्या ट्रॅफिकमध्ये अडकण्याचा अनुभव मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना आला आहे. यानंतर राज ठाकरे यांनी टोलनाक्यावर उतरून कर्मचाऱ्याला सज्जड दम दिला.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पुणे : टोलनाक्याच्या ट्रॅफिकमध्ये अडकण्याचा अनुभव मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना आला आहे. पिंपरी चिंचवडमध्ये 100व्या नाट्यसंमेलनाचा कार्यक्रम आटोपून राज ठाकरे एक्स्प्रेस हायवेवरून मुंबईच्या दिशेने जात होते, त्यावेळी खालापूर टोलनाक्यावर मुंबईच्या दिशेने जात असताना असंख्य गाड्या टोलनाक्यावर पाच किलोमीटर रांगेत ट्राफीकमध्ये अडकल्या होत्या.
'पुन्हा बांबू लावला तर सगळ्यांच्या बांबू लावेन', टोलनाक्यावर उतरून राज ठाकरेंचा इशारा, Video
'पुन्हा बांबू लावला तर सगळ्यांच्या बांबू लावेन', टोलनाक्यावर उतरून राज ठाकरेंचा इशारा, Video
advertisement

ट्राफीकमुळे लोकांची गैरसोय होत असल्याचं पाहून राज ठाकरे स्वत: टोलनाक्यावर गेले आणि त्यांनी अडकलेल्या ऍम्ब्युलन्सला रस्ता करून दिला. यानंतर राज ठाकरे यांनी खास त्यांच्या शैलीत टोलनाक्यावरच्या कर्मचाऱ्याला दम दिला.

पुन्हा बांबू लावला तर सगळ्यांच्या बांबू लावेन मी, एक जरी गाडी अडकली तरी याद राखा. कुठपर्यंत ट्राफीक आहे ते माहिती आहे का? असा इशारा राज ठाकरे यांनी टोल कर्मचाऱ्याला दिला.

advertisement

राज ठाकरे यांच्या मनसेने याआधी टोलच्या मुद्द्यावरून अनेकवेळा आक्रमक आंदोलनं केली आहेत. काहीच दिवसांपूर्वी मुंबई-गोवा हायवेचं काम पूर्ण होत नसल्यामुळे आंदोलन केलं होतं. राज ठाकरे यांच्या इशाऱ्यानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांनी मुंबई-गोवा हायवेवर अनेक ठिकाणी टोलनाके आणि कंत्राटदाराचं कार्यालयही फोडलं होतं.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Raj Thackeray : 'पुन्हा बांबू लावला तर सगळ्यांच्या बांबू लावेन', टोलनाक्यावर उतरून राज ठाकरेंचा इशारा, Video
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल