मनसे नेते संदीप देशपांडे यांच्याकडून मागील काही दिवसात युतीच्या मुद्यावरून ठाकरे गटावर टीका करण्यात येत आहे. तर, दुसरीकडे ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांच्याकडून त्यांना संयमित शब्दात प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न होत आहे. आज पु्न्हा एकदा देशपांडे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
उद्धव यांच्यावर टीकेचे बाण, भास्कर जाधवांचे नाव घेत म्हणाले...
advertisement
संदीप देशपांडे यांनी आज ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांचे नाव घेत उद्धव यांच्यावर टीकास्त्र सोडले. भास्कर जाधव यांनी काही दिवसांपूर्वी दिलेल्या मुलाखतीनंतर ते नाराज असल्याची चर्चा सुरू झाली होती. मुलाखतीत त्यांनी नेहमीप्रमाणे रोखठोकपणे मते मांडल्याने त्यांच्या विधानांवरून ते नाराज असल्याची चर्चा पक्षात सुरू झाली. संदीप देशपांडे यांच पार्श्वभूमीवर ट्वीट केले आहे. 'महाराष्ट्राच्या मनातलं ओळखणाऱ्यानी श्री भास्कर जाधव यांच्या मनातलं ओळखलं का ?', असा सवाल त्यांनी केला आहे.
मनसेसोबतच्या युतीवर भाष्य करताना उद्धव ठाकरे यांनी जे महाराष्ट्राच्या मनात आहे, लोकांच्या मनात आहे तेच होणार असल्याचे म्हटले होते. त्याचाच धागा पकडत देशपांडे यांनी हे ट्वीट केले आहे.
काही आठवड्यांपासून महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात मनसे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या युतीची चर्चा रंगली आहे. स्थानिक पातळीवरही कार्यकर्त्यांमध्ये संवाद वाढताना दिसत होता. मात्र, मागील काही दिवसांपासून मनसेकडून टीकेचे बाण सुरू झाले आहेत.
मनसे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे एकत्र येणार, म्हणजेच मनसे आणि ठाकरे गट युतीच्या शक्यता निर्माण झाल्या होत्या. स्थानिक पातळीवरही कार्यकर्त्यांमध्ये संवाद वाढताना दिसत होता. मात्र, मागील काही दिवसांपासून टीकेचे बाण सुरू झाले आहेत.