राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात म्हटले की, स्थानिक पक्ष संपवून टाकण्याचा प्रयत्न सुरू आहे. माझ्याकडे आलेल्या खात्रीशीर माहितीनुसार, जवळपास 96 लाख मतदार यादीत घुसवले आहेत. प्रत्येक शहरात लोकं घुसवले आहेऱ् असे होणार असेल तर कश्यासाठी घेता, कशासाठी मतदार घेता. तुम्ही मतं द्या, नाही तर नका देऊ मॅच फिक्स असल्याचा आरोप राज ठाकरे यांनी केला. हे कोणत्या ना कोणत्या प्रकारचे नाकारचे षडयंत्र आहे ही कोणत्या प्रकारची निवडणूक आहे. जर मतदार याद्या सेट असतील तर तुम्ही मतदान करा नाही तर नका करू, याकडे ही राज ठाकरे यांनी लक्ष वेधले.
advertisement
राज ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधताना म्हटले की, मी निवडणूक आयोगावर बोलतो तर तुम्हाला का जळतय. मला कळत नाही सत्ताधारी पक्षाची लोकं का चिडत आहेत. हीच माणसं जेंव्हा विरोधी बाकावर गेले तेंव्हा हेच बोलत होते. राज ठाकरे यांनी विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे 2014 च्या निवडणूक प्रचारातील भाषण दाखवले. या भाषणात नरेंद्र मोदी यांनी निवडणूक आयोगावर शंका उपस्थित करत सवाल केले होते.
मोदी भाषणात काय म्हणाले?
आज सार्वजनिक पद्धतीने आसनसोलच्या सभेत निवडणूक आयोगाकडे गंभीर तक्रार करतोय. निवडणूक आयोग जर निष्पक्ष पद्धतीने निवडणूक करू इच्छित असेल तर त्यांना आवाहन आहे की, गुजरातमध्ये शांतते निवडणूक होत असेल तर त्याचे श्रेय निवडणूक आयोगाकडे जात नाही. पण, अशांततेत निवडणूक झाल्यास त्याचे श्रेय निवडणूक आयोगाकडे जाते. निवडणूक आयोगाचे काम आहे. त्यांनी नागरिकांचे संरक्षण करावे. बंगाल, बिहार, पूर्व उत्तर प्रदेशात रिगिंग हिंसाचार होत आहे. पंतप्रधानांपेक्षा अधिक हक्क आहेत. तरीही तुम्ही काय करत आहात, निष्पक्ष निवडणूक घेणे ही आयोगाची जबाबदारी आहे. कोणी नियुक्ती केली हे महत्त्वाचे आहे.
राज ठाकरे यांनी म्हटले की, मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना निवडणूक आयोगावर प्रश्न उपस्थित करत होते. तेच प्रश्न आम्ही उपस्थित करत आहोत, त्यावर राग का यावा असा सवाल त्यांनी केला.