मनोज जरांगे पाटील हे मूळचे जालन्याच्या अंबड तालुक्यातील. रावसाहेब दानवे पाटील आणि जरांगे पाटील यांचे उत्तम संबंध आहेत. सरकारचे शिष्टमंडळ जरांगे पाटील यांना भेटण्यापूर्वी दानवेंनी विखे पाटलांची भेट घेतल्याचे उलट सुलट चर्चांना सुरुवात झाली आहे.
सरसकट कुणबी दाखले आणि सगेसोयरे मागण्यांवर काय वाटतं? दानवे म्हणाले...
विखे पाटील यांच्याशी भेटीचे कारण विचारले असता वैयक्तिक भेट असल्याचे सांगून दानवेंनी वेळ मारून नेली. मनोज जरांगे पाटील यांच्या सरसकट कुणबी दाखले आणि सगेसोयरे मागण्यांवर दानवे पाटील यांना विचारल्यावर त्यांनी न्यायमुर्ती संपत शिंदे यांच्या समितीकडे बोट दाखवले.
advertisement
न्या. शिंदे समितीचा अहवाल काय येतोय, हे पाहिले पाहिजे
मनोज जरांगे पाटील यांना घटनेने आंदोलन करण्याचा आणि उपोषण करण्याचा अधिकार दिला आहे. फक्त आंदोलन करताना दुसऱ्यांना त्रास होणार नाही, याची दक्षता त्यांनी घ्यावी, असा सल्ला रावसाहेब दानवे पाटील यांनी दिला. परंतु न्यायालयाचे निर्णय सर्वांनाच बंधनकारक असतात. त्यांनाही न्यायालयाचे निर्णय मान्य करावे लागतील. या सगळ्या गोष्टी शिंदे समितीच्या अधिकारातील आहे. या गोष्टी कुणी एक माणूस ठरवू शकत नाही. न्या शिंदे समितीचा अहवाल काय येईल हे पाहिले पाहिजे. तो अहवाल शासन स्वीकारेल.
जरांगे पाटील यांच्या मागण्यांबद्दल शासन सकारात्मक
देवेंद्र फडणवीस यांच्याच नेतृत्वाखाली आरक्षण दिले गेले होते. परंतु सत्तांतरानंतर सर्वोच्च न्यायालयात आरक्षण टिकविण्यात संबंधित सरकारला यश आले नाही. आता पुन्हा आमचे सरकार जरांगे पाटील यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक आहे. त्यांच्या मागण्यांवर सरकारचे प्रतिनिधी चर्चा करतील, असे रावसाहेब दानवे म्हणाले.