छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यातील बनोटी येथील एका व्यापाऱ्याच्या घरी सोनेरी रंगाचा दुर्मीळ बेडूक नुकताच आढळून आला असून त्याची लांबी ४ ते ५ इंच आहे. राज्यात हा बेडूक पहिल्यांदाच आढळल्याची नोंद केंद्रस्तरीय झुलॉजिकल सोसायटी ऑफ इंडियाच्या पोर्टलवर करण्यात आलेली आहे. याविषयीच माहिती सांगितलेली पर्यावरण अभ्यासक डॉ. संतोष पाटील यांनी दिली.
advertisement
सोयगाव तालुक्यातील बनोटी गावात हार्डवेअरचे व्यापारी सुनील पाटील यांच्या नदीकाठी असलेल्या घरी इलेक्ट्रिक वॉटर गिझर नादुरुस्त झाला होता. त्याची दुरुस्ती काम चालू होतं. गिझर दुरुस्ती करत असताना सोनेरी रंगाचा दुर्मीळ बेडूक त्यांच्या निदर्शनास आला. गिझर जमिनीपासून नऊ फूट उंचीवर असतानाही आवाज झाल्याने हा बेडूक जलदगतीने भिंतीवरून चढला कसा,याबाबत शंका आली. त्यानंतर पर्यावरण अभ्यासत यांना बोलून हा बिंदू दाखवण्यात आला.
या बेडकाचे व्यवस्थित निरीक्षण केले असता तो दुर्मीळ बेडूक आहे, असं निदर्शनास आलं. 'गोल्डन ट्री फ्रॉग' असं त्याला म्हटलं जातं. राज्यात हा बेडूक पहिल्यांदाच आढळल्याची नोंद झुलॉजिकल सोसायटी ऑफ इंडियाच्या पोर्टलवर असल्याची माहिती डॉ. पाटील यांनी दिली. आणि त्यानंतर या बेंडकाला अधिवासात सोडून देण्यात आलेल्या.
लहान कीटक, कीड, पिकांना त्रासदायक गोगलगायी या छोट्या जिवांचं भक्ष्य करून हा बेडूक आपली उपजीविका करतं. झाडं, गवताळ जागा, विशेषकरून झुडपं, दमट जागी उगवलेले गवत याठिकाणी हे बेडूक अधिवास करतात. अधिवासास धोका, जलप्रदूषण, हवामानातील बदल यांमुळे या बेडकांची संख्या खूप कमी झाली आहे. असं देखील पर्यावरण अभ्यासा डॉक्टर संतोष पाटील यांनी सांगितला आहे.