भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षाला पितृ पक्ष मानलं जातं. याला 'महालय' असंही म्हणातात. आपल्या नातेवाईकाचा मृत्यू ज्या तिथीस झाला असेल त्याचं श्राद्ध पितृपक्षातील त्याच तिथीला करण्याची हिंदू परंपरा आहे. या निमित्ताने आपल्या दिवंगत पूर्वजांचे स्मरण केलं जातं. याशिवाय, नाशिक येथील रामकुंड व त्र्यंबकेश्वर या ठिकाणी पितृ पक्षात पिंड दान, नारायण नागबली आणि त्रिपिंडी विधी देखील केले जातात. या मागे देखील धार्मिक कारणं आहेत.
advertisement
Pitru Paksha: पितृ पक्षात मिळतील पूर्वजांचे आशीर्वाद, श्राद्ध तिथी माहित नसेल तर अशी करा पूजा?
प्रभू श्रीरामांनी वनवासात असताना आपल्या वडिलांचं पिंड दान नाशिकमधील पंचवटीत गोदाकाठी केलं होतं. तेव्हापासून अशी आख्यायिका आहे की, मृत व्यक्तीच्या अस्थि राम कुंडात विसर्जित केल्यास त्याला मोक्ष मिळतो. असं म्हणतात की, याठिकाणी विसर्जित केलेल्या अस्थिंचं अवघ्या तीन तासात पाण्यात रुपांतर होतं. या ठिकाणी पिंड दान व श्राद्ध केल्यास आपल्या पितराना शांति व मोक्ष प्राप्त होतो.
पितृ पक्षात त्र्यंबकेश्वर येथे नारायण नागबली आणि त्रिपिंडीची पूजा केली जाते. याबाबत असं सांगितलं जातं की, या ठिकाणी ब्रम्हा,विष्णु आणि महेश विराजीत आहेत. याच ठिकाणाहून दक्षिण गंगा म्हणजेच गोदावरीचा उगम झालेलाआहे. त्यामुळे याठिकाणी केलेला नारायण नागबली पूजाविधी पूर्वजांना शांती मिळवून देतो. या पूजेमुळे कुटुंबात सुख-समृद्धी येते आणि जीवनातील समस्या दूर होतात, अशी धार्मिक श्रद्धा आहे.