पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती का वाढल्या? - रोहित पवार
मार्च महिन्यात कच्च्या तेलाची 84 डॉलर प्रति बॅरल असणारी किंमत एप्रिल महिन्यात 74 डॉलर प्रति बॅरलपर्यंत खाली उतरत असेल तर देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती कमी झाल्या पाहिजेत की वाढल्या पाहिजेत? असा सवाल रोहित पवार यांनी विचारला आहे.
रोहित पवारांची सडकून टीका
advertisement
कच्च्या तेलाच्या किंमती कमी होताच या लुटारू सरकारने पेट्रोल डिझेलवरील एक्साईज ड्युटीमध्ये 2 रुपयांची वाढ केली, घरगुती गॅस सिलिंडरमध्येही 50 रुपयांची वाढ केली. सामान्य जनतेला अच्छे दिन दाखवण्याची थोडी जरी भावना सरकारमध्ये असती तर कच्च्या तेलाच्या उतरलेल्या किंमतीचा दिलासा सर्वसामान्यांनाही दिला असता, असं रोहित पवार यांनी सांगितलं.
महागाई वाढली म्हणून बोंबा मारणारी भाजपा गप्प का? - रोहित पवार
UPA सरकारच्या काळात कच्च्या तेलाचे भाव 110 डॉलर असायचे तेव्हा पेट्रोलचे भाव 80 रुपये लिटर असताना महागाई वाढली म्हणून बोंबा मारणारी भाजपा आज कच्च्या तेलाच्या किंमती 74 डॉलर असताना पेट्रोलचे भाव 105 रुपयाच्या पुढे गेल्यावर देखील गप्प का? असा सवाल रोहित पवार यांनी विचारला आहे.
11220 कोटींचं गणित
दरम्यान, देशात वर्षाकाठी एकूण 5000 कोटी लिटर्स पेट्रोल तर 11220 कोटी लिटर डिझेल विक्री होते. लिटरमागे 2 रुपये वाढवून 32000 कोटीची लूट केंद्र सरकार करणार आहे. महाराष्ट्रातून 3200 कोटींची लूट होणार आहे. HSRP नंबर प्लेटमधून आधी 1800 कोटी लुटले आणि आता हे 3200 कोटी..., असं रोहित पवार यांनी ट्विट करत म्हटलं आहे.