धर्मादाय आयुक्तालयात 179 जागांसाठी भरती, तरूणांसाठी मोठी संधी; असा करा अर्ज
दक्षिण रेल्वे विभागामध्ये 2025- 26 अंतर्गत देशातल्या खेळाडूंसाठी नोकरभरती सुरू झाली आहे. 12 सप्टेंबरपासून सुरू झालेली भरती प्रक्रिया 12 ऑक्टोबरपर्यंत रात्री 23:59 मिनिटांपर्यंत अर्ज करण्याची तारीख आहे. भरती प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने भरती प्रक्रिया केली जाणार आहे. http://www.rrcmas.in या अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्जदारांनी जाहिरात वाचावी. लेव्हल 4-5 मध्ये, ॲथलेटिक्स महिला-1, बॉक्सिंग महिला- 1, क्रिकेट पुरूष- 1, टेनिस पुरूष- 2 अशा जागा आहेत. तर, लेव्हल 2- 3 साठी ॲथलेटिक्स पुरूष- 2, ॲथलेटिक्स महिला- 2, बास्केटबॉल पुरूष-1, बास्केटबॉल महिला-4, बॉक्सिंग पुरूष- 1, क्रिकेट पुरूष- 2, क्रिकेट महिला- 1, गोल्फ-1 , स्विमिंग पुरूष- 1 , टेनिस पुरूष- 1 अशा जागांवर भरती केली जाणार आहे.
advertisement
'इंडियन ऑइल' मध्ये विविध पदांची भरती, इंजिनियर उमेदवारांसाठी मेगाभरती...
तर लेव्हल- 1 बद्दल बोलायचे तर, ॲथलेटिक्स पुरूष- 5, ॲथलेटिक्स महिला- 5, बास्केटबॉल पुरूष- 3, बॉक्सिंग पुरूष- 4, बॉक्सिंग महिला- 5, क्रिकेट पुरूष- 3, क्रिकेट महिला- 1, फुटबॉल पुरूष- 5, गोल्फ पुरूष- 1, हॉकी पुरूष- 6, स्विमिंग पुरूष- 2, वेटलिफ्टींग पुरूष- 2, वेटलिफ्टींग महिला- 4 अशा जागांवर भरती केली जाणार आहे. या सर्व विभागांमध्ये, कोणत्याही अनुभवाची आवश्यकता नाही. परंतु, संबंधित क्षेत्रामधील ज्ञानाची आवश्यकता आहे. उमेदवारांकडे अधिकृत अधिसूचनेत नमूद केलेल्या क्रीडा पात्रतेनुसार आवश्यक क्रीडा कामगिरी असणे बंधनकारक. शिवाय, 01-04-2023 किंवा त्यानंतरची क्रीडा कामगिरी ग्राह्य धरली जाईल. सोबतच, उमेदवार आपापल्या क्रीडा प्रकारात सक्रिय असणे आवश्यक, असे निकष उमेदवारांना असणार आहे.
लोकल आणि टॅक्सी विसरा! आता बोटीने करा प्रवास, जलवाहतुकीचे नवीन मार्ग होणार खुले
निकषांप्रमाणेच उमेदवारांना शैक्षणिक पात्रतेची ही आवश्यकता आहे. वेगवेगळ्या लेव्हलसाठी वेगवेगळी शैक्षणिक पात्रता आहे. लेव्हल 4-5 साठी उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून ग्रॅज्युएशन पूर्ण केलेले हवे. लेव्हल 2- 3 साठी 12 वी (+2 स्टेज) उत्तीर्ण किंवा समकक्ष परीक्षा, किंवा मॅट्रिक्युलेशन (10 वी) उत्तीर्ण + अप्रेंटिसशिप कोर्स पूर्ण, किंवा मॅट्रिक्युलेशन (10 वी) + आयटीआय (NCVT/SCVT मान्यताप्राप्त) पदवी हवी. लेव्हल- 1 साठी 10 वी उत्तीर्ण किंवा आयटीआय (ITI) किंवा समकक्ष, किंवा नॅशनल अप्रेंटिसशिप सर्टिफिकेट (NAC) (NCVT कडून प्रदान केलेले) आवश्यक आहे. उमेदवाराची वयोमर्यादा जास्तीत जास्त 25 वर्षे असून कमीत कमी 18 वर्षे इतकी आहे. कोणत्याही वर्गाला वयोमर्यादेत शिथिलता देण्यात आलेली नाही.
रेल्वे स्टेशनवर खराब खाद्यपदार्थांची विक्री; पुण्यातील धक्कादायक प्रकार उघड
खुल्या प्रवर्गासाठी आणि इतर व्यक्तींसाठी अर्जाचे शुल्क 500 रूपये इतके असणार आहे. तर अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, महिला, माजी सैनिक, दिव्यांग, अल्पसंख्याक समाजातील अर्जदारांना आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील अर्जदारांना 250 रूपये इतके अर्जाचे शुल्क असणार आहेत. नोकर भरती निघालेल्या उमेदवारांना नोकरीमध्ये नियुक्त झाल्यानंतर मिळणाऱ्या पगारामध्ये 7 व्या वेतन आयोगाप्रमाणे पगार मिळणार आहे. लेव्हल- 1 साठी 18,000 रूपये पगार, लेव्हल- 2 साठी 19,900 रूपये पगार आहे. तर, लेव्हल- 3 साठी 21,700 रूपये पगार, लेव्हल- 4 साठी 25, 500 रूपये पगार, लेव्हल- 5 साठी 29,200 पगार मिळणार आहे.
