IOCL Bharti 2025 : 'इंडियन ऑइल' मध्ये विविध पदांची भरती, इंजिनियर उमेदवारांसाठी मेगाभरती; असा करा अर्ज
- Published by:Chetan Bodke
- local18
Last Updated:
इंडियन ऑईल कंपनीमध्ये नोकरीची संधी आहे. मेगा भरती केली जाणार आहे. अद्याप एकूण पदांची संख्या जाहीर करण्यात आलेली नाही. तरुण युवकांसाठी ही नोकरीची फार मोठी संधी आहे.
इंडियन ऑईल कंपनीमध्ये नोकरीची संधी आहे. मेगा भरती केली जाणार आहे. अद्याप एकूण पदांची संख्या जाहीर करण्यात आलेली नाही. तरुण युवकांसाठी ही नोकरीची फार मोठी संधी आहे. अलीकडेच इंडियन ऑईल कंपनीने नोकरी संबंधितची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. अनेक वेगवेगळ्या पदांसाठी भरती करण्यात येणार असल्यामुळे तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे.
इंडियन ऑईल कंपनीने अलीकडेच नोकर भरती जाहीर केली आहे. 12 सप्टेंबरला भरती जाहीर केली असून अर्ज भरण्याची शेवटची तारीख सप्टेंबर महिन्यात आहे. इंजिनिअर/ ऑफिसर (ग्रेड-A) (Chemical/ Electrical and Instrumentation) आणि ज्युनियर इंजिनिअर/ ऑफिसर (Chemical/ Mechanical/ Electrical/ Instrumentation) अशी पदभरती करण्यात येणार आहे. पद संख्या नमूद करण्यात आली नसून निवड प्रक्रिया दरम्यानच मर्यादित उमेदवारांची निवड केली जाणार आहे.
advertisement
अनुक्रमे पहिल्या पदासाठी ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 सप्टेंबर पर्यंत संध्याकाळी 5 वाजेपर्यंतची मुदत आहे. तर, दुसऱ्या पदासाठी ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 सप्टेंबर पर्यंत संध्याकाळी 5 वाजेपर्यंतची मुदत आहे. तर, वयोमर्यादा जास्तीत जास्त 26 वर्षे असून कमीत कमी 18 वर्षापर्यंत आहे. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीतील उमेदवारांना 5 वर्षाची सूट असणार आहे. तर इतर मागासवर्गातील उमेदवारांना 3 वर्षांची सूट असणार आहे. अनेक तरूणांसाठी प्रमुख मानल्या जाणाऱ्या भरतीचे नोकरीचे ठिकाण संपूर्ण महाराष्ट्रात कुठेही असू शकते.
advertisement
पहिल्या पदासाठी सामान्य उमेदवाराला 65% गुणांसह BE/ B.Tech पदवी हवी आहे. (Chemical/Electrical/Instrumentation) या विषयातील पदवीची गरज आहे. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि अपंग व्यक्तींना 55% गुणांची आवश्यकता आहे. तर दुसऱ्या पदासाठी सामान्य उमेदवाराला 65% गुणांसह इंजिनियरिंग डिप्लोमा पदवी हवी आहे. (Chemical/ Mechanical/ Electrical/ Instrumentation) या विषयातील पदवीची गरज आहे. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि अपंग व्यक्तींना 55% गुणांची आवश्यकता आहे. आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि अपंग व्यक्तींना फॉर्म भरताना कोणतीही फी आकारली जाणार नाही. तर दोन्हीही पदांसाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना, इतर मागासवर्गातील उमेदवारांना आणि आर्थिक दुर्बल घटकां मोडल्या जाणाऱ्या उमेदवारांसाठी 400 ते 500 रूपया दरम्यानची फी आकारली जाईल. ऑनलाईन अर्जाप्रमाणे परीक्षा सुद्धा ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. परीक्षेची तारीख 31 ऑक्टोबर असून परीक्षेच्या काही दिवस आधी उमेदवारांना हॉलतिकिट मिळेल.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 14, 2025 2:37 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
IOCL Bharti 2025 : 'इंडियन ऑइल' मध्ये विविध पदांची भरती, इंजिनियर उमेदवारांसाठी मेगाभरती; असा करा अर्ज