Dharmaday Ayuktalay Bharti 2025 : धर्मादाय आयुक्तालयात 179 जागांसाठी भरती, तरूणांसाठी मोठी संधी; असा करा अर्ज

Last Updated:

Dharmaday Ayuktalay Bharti 2025 : सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरूणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. धर्मादाय आयुक्तालयात अनेक तरूणांसाठी नोकरीची संधी आहे. 10 वी उत्तीर्ण, पदवीधर उमेदवारांसाठी आणि विधीच्या उमेदवारांसाठी ही नोकरभरती आहे.

News18
News18
सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरूणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. धर्मादाय आयुक्तालयात अनेक तरूणांसाठी नोकरीची संधी आहे. 10 वी उत्तीर्ण, पदवीधर उमेदवारांसाठी आणि विधीच्या उमेदवारांसाठी ही नोकरभरती आहे. धर्मादाय ही एक ट्रस्ट असून या ट्रस्टमध्ये तरूणांना नोकरीची संधी आहे. 179 जागांसाठी महाराष्ट्र सरकारकडून भरती केली जात आहे.
धर्मादाय आयुक्तालयामध्ये 179 जागेसाठी भरती केली जाणार आहे. विधी सहाय्यक, लघुलेखक (उच्च- कनिष्ठ श्रेणी), निरीक्षक, वरिष्ठ लिपिक अशा वेगवेगळ्या पदांसाठी भरती केली जाणार आहे. विधी सहायक पदासाठी 3 उमेदवारांची भरती केली जाणार आहे. उच्च श्रेणीतील लघुलेखक पदासाठी 2 उमेदवारांची भरती केली जाणार आहे. कनिष्ठ श्रेणीतील लघुलेखक पदासाठी 22 उमेदवारांची भरती केली जाणार आहे. निरीक्षक पदासाठी 121 पदासाठी भरती केली जाणार आहे. तर, वरिष्ठ लिपिक पदासाठी 31 पदासाठी भरती केली जाणार आहे.
advertisement
धर्मादाय आयुक्तालयातील 179 पदांसाठीची ही भरती 12 सप्टेंबरपासून सुरू झाली आहे. तर, अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 ऑक्टोबरपर्यंत रात्री 11 वाजून 55 मिनिटांपर्यंतची वेळ उमेदवारांना आहे. अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन असून परीक्षेची पद्धतही आणि अर्ज शुल्क भरण्याची पद्धतही ऑनलाइनच आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख आणि अर्ज शुल्क भरण्याची शेवटची तारीख एकच असून अर्जदार जो पर्यंत शुल्क भरत नाही, तोपर्यंत त्याचा अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही. अर्जाचे शुल्क भरल्यानंतर अर्जदारांच्या समोर अर्जाची पीडीएफ सुद्धा येईल, ती तुमच्याकडे सेव्ह करून ठेवा.
advertisement
धर्मादाय आयुक्तालयात अर्ज भरण्यासाठी वयाची अट देण्यात आली आहे. कमीत वय 18 तर जास्तीत जास्त वय 38 अशी वयोमर्यादा करून दिलेली आहे. तर, मागासवर्गीय, अनाथ आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बळ घटकातील उमेदवारांना वयाच्या 5 वर्षांची सूट आहे. तर, मागासवर्गीय आणि अनाथ उमेदवारांना 900 रूपये अर्ज शुल्क आकारले जाणार आहे. तर, खुल्या प्रवर्गासाठी 1000 रूपये अर्जाचे शुल्क आकारले जाणार आहे. शैक्षणिक पात्रतेसह इतर अनेक गोष्टींसाठी जाहिरातीवर एकदा नजर टाका...
advertisement
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Dharmaday Ayuktalay Bharti 2025 : धर्मादाय आयुक्तालयात 179 जागांसाठी भरती, तरूणांसाठी मोठी संधी; असा करा अर्ज
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement