TRENDING:

धक्कादायक! सचिन तेंडुलकरच्या बॉडीगार्डची आत्महत्या, मध्यरात्रीच डोक्यात झाडून घेतली गोळी

Last Updated:

सचिन तेंडुलकर यांच्या बॉडीगार्डने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून घेत त्यांनी आत्महत्या केली.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
जळगाव (इम्तियाज अहमद, प्रतिनिधी) : सचिन तेंडुलकर यांच्या बॉडीगार्डने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून घेत त्यांनी आत्महत्या केली. जामनेर शहरातील जळगाव रोडवरील गणपती नगरमध्ये वास्तव्यास असलेल्या प्रकाश गोविंदा कापडे (वय 37) यांनी राहत्या घरी डोक्यात गोळी झाडून घेत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.
प्रकाश कापडे यांची आत्महत्या
प्रकाश कापडे यांची आत्महत्या
advertisement

प्रकाश कापडे हे SRPF मध्ये भरती झाले होते. त्यानंतर त्यांची पोस्टिंग होऊन ते मुंबई येथे सचिन तेंडुलकर यांचे बॉडीगार्ड म्हणून कर्तव्यावर होते. आठ दिवसांपासून कापडे मुंबई येथून जामनेर येथे आपल्या गणपती नगर येथील घरी आले होते. रात्री 1 वाजेच्या सुमारास प्रकाश कापडे यांनी राहत्या घरी डोक्यात गोळी झाडून घेत आत्महत्या केली. यावेळी घरातील सर्व झोपले होते. गोळीबाराचा आवाज आल्यानंतर  घरातील लोक धावत आले तेव्हा प्रकाश हे रक्ताच्या थारोळ्यात पडलेले आढळले. घटनेची माहिती मिळताच जामनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किरण शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.

advertisement

शेतात काम करताना भयानक घडलं; जळगावातील व्यक्तीच्या शरीराचे झाले तुकडे अन् क्षणात मृत्यू

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
हळदीला उच्चांकी भाव, डाळिंबाचे दरही तेजीत, आल्याची काय स्थिती?
सर्व पहा

यानंतर प्रकाश कापडे यांचा मृतदेह शवविच्छेदनसाठी जामनेर शहरातील उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. आत्महत्येचं कारण मात्र अद्याप समजू शकलेलं नाही . तपास सुरू असून त्यानंतर कारण स्पष्ट होईल असे पोलीस म्हणाले. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी आणि 2 मुलं असा परिवार आहे. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
धक्कादायक! सचिन तेंडुलकरच्या बॉडीगार्डची आत्महत्या, मध्यरात्रीच डोक्यात झाडून घेतली गोळी
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल