advertisement

शेतात काम करताना भयानक घडलं; जळगावातील व्यक्तीच्या शरीराचे झाले तुकडे अन् क्षणात मृत्यू

Last Updated:

एका ड्रायव्हरचा रोटावेटरमध्ये अडकून मृत्यू झाला आहे. ही घटना यावल तालुक्यातील डांभुर्णी गावात घडली

डांभुर्णी गावातील ड्रायव्हरचा मृत्यू
डांभुर्णी गावातील ड्रायव्हरचा मृत्यू
यावल (इम्तियाज अहमद, प्रतिनिधी) : शेतात काम करत असताना एका व्यक्तीसोबत एक अतिशय भयानक घटना घडली. यात एका ड्रायव्हरचा रोटावेटरमध्ये अडकून मृत्यू झाला आहे. ही घटना यावल तालुक्यातील डांभुर्णी गावात घडली. विजय जानकीराम कोळी बाविस्कर (वय 35) असं या घटनेत मृत्यू झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. या प्रकरणी यावल पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
रोटावेटरमध्ये अडकून डांभुर्णी गावातील ड्रायव्हरचा मृत्यू झाला आहे. शेतात रोटर चालवत असताना ड्रायव्हरचा मागील बाजूला तोल गेला. यामुळे विजय बाविस्कर हे रोटरमध्ये अडकले. क्षणातच त्यांच्या शरीराचे तुकडे तुकडे झाले. घटनेत त्यांचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
advertisement
होर्डिंग कोसळून अपघात -
दरम्यान सोमवारी मुंबईतूनही धक्कादायक घटना समोर आली. घाटकोपर येथे भलंमोठं होर्डिंग कोसळून अपघात झाला. या घटनेत आतापर्यंत 14 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तर 44 जणांवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अजूनही मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे. या घटनेनंतर आता संबंधित होर्डिंगबाबात धक्कादायक गोष्टी समोर येत आहेत. या घटनेला कारणीभूत ठरलेल्या त्या होर्डिंगची नोंद थेट ‘लिम्का बुक रिकोर्ड’मध्ये झालेली होती. बईतील सर्वात मोठं होर्डिंग अशी नोंद लिम्का बुक रेकॉर्डमध्ये झालेली आहे. घाटकोपरमध्ये कोसळलेलं होर्डिंग्ज अनधिकृत होते असा आरोप केला जात आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
शेतात काम करताना भयानक घडलं; जळगावातील व्यक्तीच्या शरीराचे झाले तुकडे अन् क्षणात मृत्यू
Next Article
advertisement
महाराष्ट्राच्या राजकारणात Deputy Chief Minister इतके पावरफुल का? संविधानात अधिकार शून्य, पण पॉवर अफाट; उपमुख्यमंत्री का ठरतो किंगमेकर!
राज्यात उपमुख्यमंत्री इतके पावरफुल का? संविधानात अधिकार शून्य, पण पॉवर अफाट
  • उपमुख्यमंत्री पण मुख्यमंत्र्यांचा तोडीस तोड

  • 'डेप्युटी सीएम' पदाची खरी ताकद नेमकी कशात

  • 'उपमुख्यमंत्री' पदाबद्दल काय सांगतं भारताचं संविधान

View All
advertisement