छत्रपती शिवाजी महाराजांचा 6 जून रोजी शिवराज्याभिषेक सोहळा कायमस्वरूपी बरखास्त करायला पाहिजे. शिवराज्याभिषेक सोहळ्याचा राजकारणासाठी वापर होत आहे. तिथीप्रमाणेच छत्रपती शिवाजी महाराजांचे सर्व कार्यक्रम पार पडले पाहिजेत, असंही संभाजी भिडे म्हणाले.
खरं तर, महाराष्ट्रात आधीच शिवाजी महाराजांची जयंती जन्मतारखेनुसार करायची की तिथीनुसार करायची? यावरून मागील अनेक वर्षांपासून वाद आहे, असं असताना आता राज्याभिषेक सोहळ्यावरून संभाजी भिडे यांनी वक्तव्य केलं आहे. त्यामुळे शिवराज्याभिषेक सोहळ्यावरून महाराष्ट्रात नवीन वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
advertisement
शिवराज्याभिषेक सोहळ्यासह संभाजी भिडे यांनी रायगडावरील वाघ्या कुत्र्याच्या पुतळ्याबाबत देखील वक्तव्य केलं. रायगडावरील वाघ्या कुत्र्याचा पुतळा काढायला नको. या कुत्र्याचं राजकारण करू नये. वाघ्या कुत्र्याबद्दल जे इतिहास संशोधक बोलतात, ते कोणत्या उंचीचे आहेत. याबाबत एक स्वतंत्र इतिहास संशोधक मंडळ स्थापन करावं. त्यानंतर निर्णय घ्यावा, असंही भिडे म्हणाले.