सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या नोकर भरतीला सहकार विभागाकडून स्थगिती मिळाली आहे. आमदार सदाभाऊ खोत यांनी ही माहिती दिली आहे. त्यामुळे शरद पवार गट राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखालील जिल्हा बँकेला मोठा झटका बसला आहे.
सहकार विभागाकडून जिल्हा मध्यवर्ती बँकेला 559 पदांच्या भरतीसाठी परवानगी मिळाली होती. मात्र आमदार सदाभाऊ खोत आणि आमदार गोपीचंद पडळकर यांनी नोकर भरतीवर आक्षेप नोंदवत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे तक्रार केली होती. त्यानंतर सहकार विभागाकडून जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या नोकर भरतीला स्थगिती देण्यात आल्याची माहिती आमदार सदाभाऊ खोत यांनी सांगलीत दिली आहे.
advertisement
त्याचबरोबर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या घोटाळ्यांबाबत सुरू असलेल्या चौकशी प्रकरणी निवृत्त न्यायाधीश अथवा निवृत्त सहकार आयुक्त यांच्या नेतृत्वाखाली समिती गठीत करावी आणि तोपर्यंत बँकेवर प्रशासक नेमावे, अशी मागणी देखील यावेळी सदाभाऊ खोत यांनी केली आहे.