राजू शेट्टींची सरकारवर टीका
शेतकऱ्यांनी डोळे वटवल्यानंतर सरकार घाबरून गेलं. कांदा उत्पादक शेतकऱ्यांनाही माझी विनंती आहे. डोळे वटवल्यानंतर सरकार निर्णय घेत असेल तर त्यांचे उमेदवार पाडा तरच त्यांना कांदा उत्पादका शेतकऱ्यांची ताकद कळेल. असे वक्तव्य राजू शेट्टी यांनी केले आहे. गेल्या अनेक महिन्यापासून शेतकरी कांद्याच्या निर्यात बंदीच्या विरोधामध्ये आंदोलन करत रस्त्यावर उतरत होते. पण सरकार ऐकायला तयार नव्हतं. आता लोकसभेच्या निवडणुका जवळ आल्याने सरकारला जाग आली. भारतीय जनता पक्ष आणि मित्र पक्षांचे उमेदवार धडाधड पराभूत होणार आहे, अशी लक्षणे दिसू लागली. मग सरकार जागे झाले. आणि निर्यातीस परवानगी दिली. याचं आम्ही स्वागत करतो. पण हा फार उशिराने घेतलेला निर्णय आहे. त्याच्यावरची बंधने काढून टाकावी अशी आमची मागणी आहे.
advertisement
आज घेतलेला निर्णय पुन्हा एकदा तपासून पहावा : अमोल कोल्हेंची शंका
कांद्यावरील निर्यातबंदी उठणं हा स्वागतार्ह निर्णय आहे. मात्र, आज घेतलेला निर्णय पुन्हा एकदा तपासून पहावा, असं म्हणत शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हेंनी शंका उपस्थित केली आहे. संत्रा आणि द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या निर्णयाचा दाखला देताना, बांग्लादेश सारख्या छोट्या देशासमोर स्वतःला विश्वगुरु म्हणवणाऱ्यांना गुडघे टेकायला लागले होते. याची आठवण कोल्हेंनी कांदा निर्यातबंदी निर्णयावर शंका उपस्थित करताना करून दिली.
वाचा - 'हे मी केलेलं आहे' अजितदादांकडून सुप्रिया सुळेंची नक्कल; म्हणाले माझ्या कामांवर
आधी फक्त गुजरातच्या दोन हजार मेट्रिक टन कांदा निर्यातीवरील बंदी हटविण्यात आली होती. त्यावर कोल्हेंसह मविआ नेते तुटून पडले. यामुळं महाराष्ट्रात कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये कमालीचा संताप निर्माण झाला. ही बाब भाजप सरकारच्या लक्षात आली. याची किंमत लोकसभा निवडणुकीत मोजावी लागू नये म्हणून भाजपने पुढच्या काही तासांत गुजरातसह देशभरातील 99 हजार मेट्रिक टन कांद्यावरील निर्यातबंदी हटविण्याचा निर्णय तातडीनं घेतला. पण पूर्वानुभव पाहता कोल्हेंनी हा निर्णय तपासून घ्यावा, अशी शंका उपस्थित केली आहे.
