Ajit Pawar : 'हे मी केलेलं आहे' अजितदादांकडून सुप्रिया सुळेंची नक्कल; म्हणाले माझ्या कामांवर
- Published by:Rahul Punde
 
Last Updated:
Ajit Pawar : भोर तालुक्यात बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खासदार सुप्रिया सुळे यांची नक्कल केली.
पुणे, (चंद्रकांत फुंदे, प्रतिनिधी) : बारामती लोकसभा निवणुकीकडे अवघ्या देशाचं लक्ष लागलं आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि माजी कृषीमंत्री शरद पवार यांच्यासाठी ही निवडणूक अस्तित्वाची लढाई म्हणून पाहिली जात आहे. दोन्ही गटाकडून निवडणूक जिंकण्यासाठी एकमेकांवर आरोपांच्या फैरी झडत आहे. भोरमधील सभेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुप्रिया सुळे यांची नक्कल केली आहे. मी केलेली कामं खासदार त्यांचे फोटो लावून त्यांची सांगत असल्याचा आरोप करत अजित पवारांनी खासदार सुप्रिया सुळे यांची मिमिक्री केली. याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
अजित पवारांकडून सुप्रिया सुळेंची नक्कल pic.twitter.com/xRrxh8ydtW
— News18Lokmat (@News18lokmat) April 27, 2024
काय म्हणाले अजित पवार?
खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रचार पुस्तकांत मी केलेली कामं छापण्यात आली आहेत. खासदाराने माझी सगळे कामं त्यांनी केल्याचं अजित पवारांनी म्हटलं आहे. बारामतीतील सगळ्या इमारती मी बांधल्या आहेत. मात्र फोटो त्यांच्या पुस्तकांत दिसत आहे. सुप्रिया सुळे मी केलेल्या कामांचं श्रेय घेत आहेत, असं म्हणत अजित पवारांनी सुप्रिया सुळे यांची नक्कल केली. ही कामं केली असेल तर भोर, वेल्हा आणि मुळशीत काय केलं ते दाखवा, असा सवाल अजित पवारांनी उपस्थित केला आहे. नुसती भाषणं करु होत नाही. भाषणं केल्याने जनतेचं पोट भरणार नाही त्यासाठी कृती करावी लागेल, असाही टोला अजित पवारांनी सुप्रिया सुळेंना लगावला आहे.
advertisement
वाचा - काँग्रेसच्या नाराज नेत्याला जलील यांच्याकडून थेट उमेदवारीची ऑफर, म्हणाले 'एवढाच राग असेल तर...'
मी शब्दाचा पक्का : अजित पवार
view commentsनुसतं भाषण करुन चालत नाही. मी तर सकाळपासून रात्रीपर्यंत भाषणे करेल. मात्र, त्याने यांची पोटं भरणार आहेत का? त्यासाठी प्रशासनावर पकड असावी लागते. तरच अधिकारीही कामे करतात. परंतु, तसा नाहीय. तुम्ही 3 वेळी त्यांना निवडून दिलं. पण, त्यांनी काहीच काम केलं नाही. आता यांना एकदा निवडून द्या. कोणीतरी म्हटलं दादा निवडून देतो पण काम झालं पाहिजे. मी जर काम केलं नाही तर मीच उभा राहणार नाही. मी शब्दाचा पक्का आहे. मला साथ द्या मी तुम्हाला मदत करायला तयार आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
April 27, 2024 4:08 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
Ajit Pawar : 'हे मी केलेलं आहे' अजितदादांकडून सुप्रिया सुळेंची नक्कल; म्हणाले माझ्या कामांवर


