असा घडला थरार
संग्राम पाटील यांचे कुटुंब शिराळा तालुक्यातील उपवळे येथील हनुमान मंदिराजवळ राहते. बुधवारी रात्री जेवून शिवम आणि स्वरांजली एकमेकांचे हात पकडून एका घरातून दुसऱ्या घरात जात होते. त्यावेळी दोन्ही घरांच्या मध्ये बोळात दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक स्वरांजलीवर हल्ला केला आणि तिची मान पकडली.
पुणे हादरलं! तरुणाच्या चेहऱ्याचे लचके तोडले; डोकं तोंडात धरून 10 फूट फरफटत नेलं अन्...
advertisement
भावाचे प्रसंगावधान आणि आईची धाव
बिबट्याने स्वरांजलीला ओढण्यास सुरुवात करताच तिचा हात शिवमच्या हातातून सुटला. मात्र, न डगमगता शिवमने तत्काळ स्वरांजलीचे पाय घट्ट पकडून ठेवले आणि तिला मागे ओढू लागला. दोघेजण बरेच अंतर फरफटत गेले, मात्र शिवमने तिचा पाय सोडला नाही. दरम्यान, मुलांची आई स्वप्नाली यांनी बाहेर पाहिले. बिबट्या पोटच्या गोळ्याची शिकार करताना पाहताच आईने काळीज विरघळून टाकणारे किंचाळली. तेव्हा शेजारी जमा झाल्याचे पाहून बिबट्याने आपली पकड सैल केली आणि अंधारात पळ काढला. सुदैवाने स्वरांजलीने स्वेटर आणि डोक्याला टोपी घातलेली असल्याने बिबट्याचे दात मानेत रुतले नाहीत.
या हल्ल्यात स्वरांजलीच्या मानेवर, हातावर आणि पाठीवर जखमा झाल्या आहेत. तिला तातडीने सरपंच संभाजी पाटील, प्रवीण पाटील, सुनील गायकवाड, श्रीकांत पवार तसेच कुटुंबियांनी शिराळा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. येथील डॉ. नीलेश पाटील तिच्यावर उपचार करत आहेत. घटनेची माहिती मिळताच वनपाल अनिल वाजे आणि वनरक्षक दत्तात्रय शिंदे यांनी रुग्णालयात भेट देऊन घटनेची माहिती घेतली.
स्वेटर आणि टोपी ठरली सुरक्षा कवच
थंडीमुळे स्वरांजलीने अंगात जाड स्वेटर आणि डोक्यावर टोपी घातली होती. बिबट्याने तिच्या मानेवर झडप घातली. परंतु टोपी आणि स्वेटरमुळे बिबट्याची शिकार करण्याची पकड पूर्णपणे बसू शकली नाही. भावाचे शौर्य आणि हे कपडे तिच्यासाठी जीवनदान ठरले.





