राजेश नाखुआ यांच्या मेक इंडिया इम्पेक्स व विजय मंगे यांच्या श्री सद्गुरुकृपा शिपिंग एजन्सीमार्फत परदेशात बेदाणा, मसाले व इतर साहित्याची आयात-निर्यात केली जाते. या कंपनीचे मिरजेत कार्यालय आहे. व्यवसायात रुपारेल यांच्याशी दोघांनी भागीदारी केली होती. त्यावर विश्वास ठेवून रुपारेल यांनी कंपनीत 1 कोटी 40 लाख,70 हजार रुपये गुंतवणूक केली होती. त्यानंतर वर्षभराने परताव्याची मागणी केल्यानंतर नाखुआ यांनी 50 लाख रुपये रुपारेल यांना दिले. मात्र, उर्वरित 90 लाख 70 हजार रुपये न दिल्याची तक्रार आहे.
advertisement
बेदाण्याची आवक घटली, सांगली बाजारात दरात तेजी, मिळाला तब्बल एवढा भाव
पैसे मागणीचा तगादा लावल्यानंतर ‘पैसे मागितल्यास किंवा पोलिसांत तक्रार केल्यास जिवंत सोडणार नाही’ अशी धमकी दिल्याची रुपारेल यांनी तक्रार केली आहे. रूपारेल यांच्या तक्रारीवरून दोन्ही आरोपींविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा गांधी चौक पोलिसांनी दाखल केला आहे.






