काय म्हणाले विश्वजीत कदम?
आज आम्ही महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस प्रभारी रमेश चेनीथला आणि काँग्रेसचे महासचिव मुकुल वासनिक यांना मी आणि विशाल पाटील भेटलो. दीर्घकाळ चर्चा केली. सांगलीमध्ये घडलेल्या घडामोडी संदर्भात त्यांना माहिती दिली. आमच्या दोन्ही नेत्यांनी सकारात्मक पद्धतीने आमचे सर्व म्हणणं ऐकून घेतलं आहे.
(संजय राउत) ते कुणा बाबतीत बोलत आहे मला माहित नाही. त्यांच्यात धाडस असेल तर त्यांनी नाव घेऊन बोलावं, ते राज्याचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी महाविकास आघाडीमध्ये तिढा निर्माण होईल असं वक्तव्य करण्याची गरज नाही. आम्ही संयमाने वागत आहोत. आम्ही आमच्या पक्षांतर्गत लोकशाही पद्धतीने सांगलीची जागा मागत आहोत. आजवर आम्ही कुणावरही टीका टिप्पणी केलेली नाही. मात्र, आमच्या संयमाची परीक्षा घेऊ नये, एवढीच माझी त्यांच्याकडून अपेक्षा आहे. आम्ही जिल्ह्यातील नेत्यांनी वरिष्ठ नेत्यांसमोर भावना मांडल्या आहे. आता नेत्यांकडून काय दिशा निर्देश येतात याची आम्ही वाट पाहत असल्याचे कदम यांनी सांगितले.
advertisement
वाचा - नाशिकमध्ये घडामोडींना वेग, हेमंत गोडसे मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी मुंबईला रवाना
संजय राऊत काय म्हणाले होते?
काँग्रेस नेते नाना पटोले म्हणतात त्याप्रमाणे मी सांगलीची परिस्थिती पाहण्यासाठीच आलोय. इथे शिवसेनेचा उमेदवार लढणे योग्य आहे, असे मला वाटते असेही राऊत यानी स्पष्ट केले. महाराष्ट्रमध्ये 48 पैकी 35 पेक्षा अधिक जागा आम्ही जिकू. आघाडी किंवा युतीत एखाद्या जागेवरून वाद होतोच असे सांगत सांगलीतील काँग्रेस नेत्यांची एक वेगळी भूमिका आहे, त्या भूमिकेचा मी आदर करतोय. मात्र, कोल्हापूरच्या बदल्यात सांगली लढावी ही चर्चा झाली होते असे राऊत म्हणाले. सांगली लोकसभेची सगळीकडे चर्चा आहे. सांगलीतुन शिवसेनेचे चंद्रहार पाटील दिल्लीत जाणार आहेत. मविआ सरकार पाडल्यामुळे सगळीकडे रोष आहे. त्यामुळे 400 पार चा नारा फसवा, भंपक आहे हे निकालानंतर कळेल. मोदी पुन्हा पंतप्रधान होणार नाहीत, पुन्हा भाजप सत्तेत येणार नाही, हा जनतेचा मानस आहे, असेही राऊत यानी स्पष्ट केले.
