संजय राऊत काय म्हणाले?
माजी उपाध्यक्ष धनखड आणि भाजपच्या 2024 च्या निवडणुकीतल्या विजयामागील 'शॉडो फिगर' कुठं आहेत? 21 जुलै 2025 रोजी राजीनामा दिल्यापासून धनखड बेपत्ता आहेत. पक्षांतर करणाऱ्यांना पाठिंबा देण्याच्या निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर विरोधकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. राहुल गांधी पक्षपातीपणाचा निषेध करतात, पण हा गूढ माणूस आता कुठे आहे? असं म्हणत संजय राऊत यांनी देशाचे माजी मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांचा फोटो शेअर केला आहे.
advertisement
अस्पष्ट व्यक्ती आता कुठं?
2024 च्या लोकसभा आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणुका भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांनी या गृहस्थाच्या महत्त्वपूर्ण मदतीने जिंकल्या. शिवसेना पक्ष आणि चिन्ह गद्दार गटाला देऊन त्यांनी पक्षांतराला प्रोत्साहन दिलं. राहुल गांधींनी आता निवडणूक आयोगाचा पक्षपात उघड केला आहे. पण ही अस्पष्ट व्यक्ती आता कुठं आहे? कोणी सांगू शकेल का? माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड आधीच बेपत्ता आहेत, मग हे गृहस्थ आता नेमके कुठं आहेत? असा सवाल संजय राऊत यांनी विचारला आहे.
दरम्यान, माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी 21 जुलै 2025 रोजी आरोग्याच्या कारणास्तव अचानक त्यांच्या पदाचा राजीनामा (Jagdeep Dhankhar Resignation) सादर केला. त्यानंतर पुढच्या काही दिवसात त्यांच्या प्रशासकीय आणि राजकीय स्थितीविषयी कोणतीही स्पष्ट माहिती समोर आली नव्हती. त्यामुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाली होती.