संजय राऊत म्हणाले, की यावरती आम्ही अगोदरच मत व्यक्त केलं आहे. एक-एक संस्था, महाराष्ट्रातील उद्योग गुजरातकडे वळवले जात आहेत .उद्या मुंबईसुद्धा गुजरातला देतील. ते पुढे म्हणाले, महानंदाचे चेअरमन कोण होते? राधाकृष्ण विखे पाटील यांचे सख्खे मेहुणे. मेहुणे मेहुणे सख्खे पाहुणे . महानंदामध्ये शेकडो कर्मचारी आहेत. विखे पाटील यांच्या पाहुण्यांनी आणि मेहुण्यांनी काय केलं? तुम्ही महाराष्ट्र सरकारची डेअरी चालवू शकत नाहीत? स्वतःच्या डेअरी बरोबर चालू आहेत, असा टोला त्यांनी लगावला. खोक्याचं राजकारण बरोबर चालू आहे, असा आरोपही त्यांनी केला.
advertisement
Satyapal Malik : जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक CBIच्या रडारवर; 30 ठिकाणांवर छापेमारी
नरेंद्र मोदींच्या खिशाला 25 लाखाचा पेन -
भाजपवर टीका करताना संजय राऊत म्हणाले, की जेपी नड्डा यांनी आवाहन केलं, की साधेपणाने जगा. महागड्या गाड्या ,महागडी घड्याळं वापरू नका. सामान्य माणसात जाताना श्रीमंतीचा थाट दाखवू नका. मोदी करत आहे तसं ढोंग करा, असं आवाहान जे पी नड्डा यांनी केलं असल्याची टीका राऊतांनी केली
ते म्हणाले, की100 टक्के भाजप नेत्यांकडे महागडी घड्याळं आहेत. 90 टक्के भाजप नेते परदेशी गाड्यातून फिरतात. हेही नड्डा यांनी सांगावे. नरेंद्र मोदींच्या खिशाला जो पेन आहे तो 25 लाखाचा आहे .मोदींच्या हातातील घड्याळाची किंमत काढा, मोदींचा सूट दहा ते पंधरा लाखाचा आहे. मोदींचं विमान ते खास वीस हजार कोटीचे घेतले आहे. मोदींचे सर्व मित्र अब्जाधीश आहेत. गरीब नाहीत किंवा चहा विकणारे नाहीत. त्यामुळे भाजपने हे ढोंग बंद केले पाहिजे, असा टोलाही त्यांनी लगावला आहे .. ते म्हणाले, तुम्ही एका बाजूला शेतकऱ्यांची हत्या करत आहेत, गरिबीची थट्टा करत आहे आणि आमदार खासदारांना 50० 50 कोटी देऊन सरकार बनवत आहे.
देवेंद्र फडणवीसांवर टीका -
संजय राऊत म्हणाले,आमचा बाप बाळासाहेब ठाकरे आहे तुमच्या बापाचा पत्ता तरी आहे का? तुम्हाला आता दहा बाप झाले आहेl. अजित पवार गट, मिंधे गट ,अमुक गट हे तुमचे बाप आहेत. खरा बाप असता तर भाजपला खोकेवाले बाप घेऊन महाराष्ट्रात राजकारण करावं लागलं नसतं, अशी टीका त्यांनी केली.
