Satyapal Malik : जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक CBIच्या रडारवर; 30 ठिकाणांवर छापेमारी
- Published by:Suraj Yadav
Last Updated:
सत्यपाल मलिक यांच्या ३० ठिकाणांवर छापे टाकले जात आहेत. हायड्रो पॉवर प्रोजेक्ट प्रकरणी सीबीआयकडून तपास सुरू आहे.
श्रीनगर : जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्या निवासस्थानासह अनेक ठिकाणी सीबीआयकडून छापेमारी सुरू आहे. सत्यपाल मलिक यांच्या ३० ठिकाणांवर छापे टाकले जात आहेत. हायड्रो पॉवर प्रोजेक्ट प्रकरणी सीबीआयकडून तपास सुरू आहे. याआधी विमा घोटाळ्यातही सीबीआयने मलिक यांच्याविरुद्ध कारवाई केली होती. सीबीआयने जम्मू काश्मीरमध्ये सत्यपाल मलिक आणि त्यांच्या निकटवर्तीयांच्या ठिकाणांवर छापे टाकले आहेत.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, २०१९ मध्ये किश्तवाड इथं किरू हायड्रो पॉवर प्रोजेक्टला २२०० कोटी रुपयांच्या सिव्हिल कामाचा ठेका देताना भ्रष्टाचार केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी हा छापा टाकला जात आहे. सत्यपाल मलिक 23 ऑगस्ट २०१८ ते ३० ऑक्टोबर २०१९ या काळात जम्मू काश्मीरचे राज्यपाल होते. त्यांच्यावर आरोप होता की त्यांना प्रोजेक्टच्या संबंधित दोन फाइल्सना मंजुरी देण्यासाटी ३०० कोटी रुपयांची लाच दिली गेली होती.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
February 22, 2024 11:08 AM IST
मराठी बातम्या/देश/
Satyapal Malik : जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक CBIच्या रडारवर; 30 ठिकाणांवर छापेमारी


