TRENDING:

उद्धव-राज एकत्र आल्यावर शरद पवारांची भूमिका काय? संजय राऊतांनी बातमी फोडली

Last Updated:

Sanjay Raut: शिवसेना-मनसेची युती झाल्यास आघाडीतील घटक पक्षांची काय भूमिका असणार? याकडे लक्ष लागलेले असताना शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी मोठे भाष्य केले आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : आगामी महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शिवसेना मनसे युतीच्या जोरदार चर्चा होत आहेत. त्यानिमित्ताने ठाकरे बंधूंच्या गाठीभेटीही वाढल्या आहेत. गत आठवड्यात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वाटाघाटीसाठी ठाकरे बंधूंची भेट झाल्याचे कळते. शिवसेना-मनसेची युती झाल्यास आघाडीतील घटक पक्षांची काय भूमिका असणार? याकडे लक्ष लागलेले असताना शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी मोठे भाष्य केले आहे.
मुंबई महापालिका निवडणूक
मुंबई महापालिका निवडणूक
advertisement

मनसे सेना मुंबईत एकत्र लढण्याची शक्यता आहे, असे सांगतानाच राज ठाकरेंना सोबत घेतल्यास शरद पवारांना कोणतीच अडचण नाही, असे स्पष्टपणे संजय राऊत यांनी सांगितले आहे. संजय राऊत यांनी एबीपी माझाशी संवाद साधताना मनसे-शिवसेना युती होणार असल्याच्या चर्चांवर एकप्रकारे शिक्कामोर्तब केले.

राज-उद्धव एकत्र आल्यावर शरद पवारांना कोणतीच अडचण नाही

राऊत म्हणाले, मुंबईत शिवसेनेचीच ताकद आहे. भाजपकडे एक विशिष्ट वर्ग आहे तसेच पैसे आणि सत्ता आहे. मुंबईवर मराठी माणसाचा पगडा आहे आणि राहील. मुंबईतून मराठी माणसाला हटविण्याचे प्रयत्न भाजपकडून सातत्याने होत आहेत. मुंबईत मराठी माणूसच शक्तिझाली झाला पाहिजे यासाठी शिवसेनेचा प्रयत्न हे काम फक्त राज-उद्धव ठाकरे एकत्र आल्यावरच होईल, हे काँग्रेसला देखील माहिती आहे राज-उद्धव एकत्र आल्यावर शरद पवारांना कोणतीच अडचण नाही, त्यांना महाराष्ट्राच्या भावना माहिती आहेत, असे पवार म्हणाले.

advertisement

राज-उद्धव एकत्र आल्यावर काँग्रेसची भूमिका काय?

राज-उद्धव एकत्र आल्यास काँग्रेसची काय भूमिका असेल, याविषयी विचारले असता, दिल्लीतील हाय कमांडला मुंबई महाराष्ट्रात काय चाललंय, हे इथले काँग्रेस नेते माहिती देतील. शेवटी मुंबईत मराठी माणसाचे अस्तित्व जिवंत ठेवायचे असेल तर राज-उद्धव एकत्र यायला हवेत, हे काँग्रेसला देखील माहिती आहे. त्यासंबंधीचा योग्य अहवाल काँग्रेस नेते हायकमांडला देतील, असे राऊत म्हणाले.

advertisement

आतापर्यंत मनसेने स्वतंत्र निवडणुका लढल्या, यंदा प्रथमच त्यांची युती शिवसेनेबरोबर

मविआच्या अस्तित्वावर राऊत यांना विचारले असता, विषय फक्त स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांचा आहे, आम्ही इंडिया आघाडी म्हणून सोबत आहोत. महाविकास आघाडी म्हणून देखील आम्ही सोबतच राहणार आहोत. आतापर्यंत मनसेने स्वतंत्र निवडणुका लढल्या, कुणासोबतही युती केली नाही, शिवसेनेसोबत त्यांची प्रथमच युती होण्याची शक्यता आहे, असे राऊत म्हणाले.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
उद्धव-राज एकत्र आल्यावर शरद पवारांची भूमिका काय? संजय राऊतांनी बातमी फोडली
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल