संजय राऊत माध्यमांशी बोलत होते.यावेळी संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीसांच्या व्होट जिहाद विरूद्ध धर्मयुद्धाच्या विधानावर भाष्य केले आहे. देवेंद्र फडणवीसांचं डोकं ठिकाणावर आहे का? पाकिस्तानवरती भगवा फडकवण्याचा सोडा पाक व्याप्त कश्मीर मिळून दाखवा? तिकडे जाऊन तिरंगा फडकवून दाखवा. मणिपूरमध्ये तिरंगा फडकवून दाखवा. तुम्हाला मत मिळत नाही म्हणून जिहाद का? 2014 मुस्लिम समाजाने मोदींना मतं दिलं होतं मग तोच जिहाद झाला का? भाजपाचे लोक बोखला गये है! ह्यांच्या मानसिक गोंधळाची आम्हाला चिंता वाटते. देवेंद्र फडणीस यांना उपचाराची गरज आहे, असे संजय राऊत म्हणाले आहेत.
advertisement
राऊत पुढे म्हणाले, महाराष्ट्र झोपला नाही, महाराष्ट्र जागाच आहे. म्हणून तुम्हाला लोकसभेत महाराष्ट्राने झोपवलं, असा टोला राऊतांनी लगावला. तुम्हाला हा देश इंग्रजाप्रमाणे लुटता येणार नाही म्हणून आम्ही जागे आहोत.आम्ही झोपलो असतो तर भाजपाने अर्धा सातबारा उद्योगपतींच्या नावावर केला असता, असा चिमटा देखील राऊतांनी काढला.
तसेच विधानसभा निवडणुकीदरम्यान निवडणुक पथकाकडून उद्धव ठाकरे यांच्या बॅगा तपासण्यात आल्या होत्या. यानंतर ठाकरेंनी सत्ताधारी नेत्यांच्या बॅगा तपासण्याचे आव्हान केले होते. यावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, उद्धव ठाकरेंनी आवाज उठवल्यानंतर बॅगा चेक करायला सुरुवात झाली.निवडणूक आयोग नौटंकी करत आहे. पोलिसांच्या समक्ष पैशांची देवाण-घेवाण सुरू आहे, असा आरोप देखील त्यांनी यावेळी केला.
