मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसलीय.. यावेळी मंत्री गणेश नाईकांनी शिंदेंमध्ये सुरु असलेल्या वादात राऊतांनी उडी घेतली. महायुतीनं स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी कंबर कसल्याचं दिसतंय. पण, त्याचवेळी महायुतीच्या काही नेत्यांमधील वाद मात्र शमताना दिसत नाही.
advertisement
भाजपचे ज्येष्ठ नेते आणि वनमंत्री गणेश नाईक आणि एकनाथ शिंदेंमध्ये याच वादात गणेश नाईकांनी पुन्हा एकदा नवी फोडणी दिल्याचं पाहायला मिळालं. पालघरमध्ये बोलताना वनमंत्री गणेश नाईकांनी एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावर बोलताना चिमटे काढल्याचं पाहायला मिळालं.. शिंदेंना मुख्यमंत्रीपदाची लॉटरी लागल्याचा टोला लगावत पुन्हा एकदा नाईकांनी शिंदेंना लक्ष्य केल्याचं पाहायला मिळालं. आता भाजपनं शिंदेंना चिमटा काढल्यानंतर, राऊत कसे शांत राहणार? राऊतांनी नाईकांच्या सुरात सूर मिसळत, शिंदेंवर पलटवार केला. पण, राऊतांना लॉटरी नव्हे तर मटका लागल्याचा घणाघात संजय राऊतांनी केला.
भाजपलाही राऊतांची टीका चांगलीच जिव्हारी
भाजपच्या गणेश नाईकांनी केलेल्या टीकेचा विस्तार करत राऊतांनी शिंदेंना लक्ष्य केलं.. पण, शिंदेंच्या शिवसेना आणि भाजपलाही राऊतांची टीका चांगलीच जिव्हारी लागलीय.. शिंदेंच्या शिवसेनेसह भाजपनंही राऊतांवर जोरदार पलटवार केला.
ठाणे आणि नवी मुंबईतील नेत्यांमध्ये अजूनही अंतर्गत संघर्ष सुरूच
सत्ताधाऱ्यांना राऊतांना लक्ष्य केलं असलं, तर लॉटरी वादाची सुरुवात भाजपच्याच गणेश नाईकांनी केली आहे. त्यामुळं महायुती एकसंध दिसत असली तरी ठाणे आणि नवी मुंबईतील नेत्यांमध्ये अजूनही अंतर्गत संघर्ष सुरूच असल्याचं यातून स्पष्ट होतंय.. त्यामुळं नाईक आणि शिंदेंमधील या राजकीय संघर्षात पुढे काय होतं? गणेश नाईकांच्या टीकेवर शिंदेंकडून काय प्रत्युत्तर येतं? याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय..