संभाजीनगरमध्ये ७६ वा प्रजासत्ताक दिन आज मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला पालकमंत्री संजय शिरसाट, चंद्रकांत खैरे, खासदार संदीपान भुमरे यांच्यासह जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक आदी प्रमुख अधिकारी उपस्थित होते. शिवसेना फुटीनंतर दोन्हीकडील गट एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करायचे, त्यामुळे वैयक्तिक नात्यांमध्ये कटुता आली होती. परंतु यंदाच्या प्रजासत्ताकदिनी सेना नेत्यांनी राजकीय परिपक्वता दाखवली.
advertisement
जेव्हा शिरसाट खैरेंना म्हणतात, छोडो कल की बाते...
गतसालच्या ध्वजारोहणाला चंद्रकांत खैरे आणि पालकमंत्री संदीपन भुमरे यांच्यात वाद झाला होता. संदीपन भुमरे घटनाबाह्य पालकमंत्री आहेत, असे म्हणत त्यांचे अभिनंदन करणे किंबहना अभिवादन स्वीकारणे खैरे यांनी टाळले होते. परंतु यावेळी राजकीय अभिनिवेश बाजूला ठेवून खैरे यांनी शिरसाट यांच्याशी हस्तांदोलन केले, त्यांच्याशी गप्पा मारल्या. या सगळ्या प्रसंगावर विचारले असता, राजकीय वादविवाद न करता विकासासाठी एकत्र आलेच पाहिजे. छोडो कल की बाते... असे शिरसाट म्हणाले.
खैरे शिरसाट यांचे एकमेकांकडे पाहून स्मितहास्य
पालकमंत्री संजय सिरसाट यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. पालकमंत्री शिरसाट मान्यवरांना अभिवादन करण्यासाठी जीपवर उभे राहून आले, त्यावेळी ठाकरे गटाचे जेष्ठ नेते खैरे उभे राहिले आणि हात जोडून अभिवादन स्वीकारले... त्यानंतर दोघांनीही एकमेकांकडे पाहून स्मितहास्य केले. हे दृश्य बघून सर्वपक्षीय नेत्ंयाच्या चेहऱ्यावर हसू उमटले. गतसाली असलेले पालकमंत्री संदीपान भुमरे यांचे अभिवादन न स्वीकारता चंद्रकांत खैरे निघून गेले होते.
