संतोष देशमुख हत्या प्रकरणात देशमुख कुटुंबियांना न्याय मिळावा यासाठी आज पैठणमध्ये मोर्चा काढण्यात आला होता.या मोर्च्याला संबोधित करताना मनोज जरांगे यांनी धनंजय मुंडेंवर जोरदार हल्ला चढवला. धनंजय मुंडे यांनी षडयंत्र सुरू केलं आहे. आता माझ्यावर केसेस सपाटा लावला आहे. धनंजय देशमुख यांना धनंजय मुंडे यांचें गुंड धमकी देत आहे, असा आरोप मनोज जरांगे यांनी केला आहे.
advertisement
तुझं पाप झाकण्यासाठी ओबीसी आसरा घेतोयस. खून करणार तुम्ही पापं करणार आणि ओबीसी पांघरून घालणार, असा टोला जरांगेनी धनंजय मुंडे यांना लगावला आहे. धनंजय मुंडे तुमचे पाय खोलात जात आहे. तुम्ही तुमच्या लाभार्थी टोळीला सांगून आरोपीला साथ देत आहात. तुमच्या कुटुंबाला कोणी मारल तर आम्ही असेच मोर्चे काढायचे का ?असाही सवाल जरांगेंनी यावेळी उपस्थित केला.
आता माझ्यावर केसेस सपाटा लावला आहे. माझ्यावर हजार केसेस करा मागे हटणार नाही. माझ्या विरोधात शंड आणि गुंडाच्या टोळ्या उभ्या कर मी मागे हटत नाही. आता मी तुला सोडणार नाही. बीड पासून मुंबई पर्यंत सगळ काढतो. धनंजय मुंडे आता 25 नंतर कायदेशीर भेटू, असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला.
,असा इशारा मनोज जरांगे यांनी धनंजय मुंडे यांना दिला.
