साताऱ्यातील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणाने राज्यात एकच खळबळ उडाली. महिला डॉक्टरने हॉटेलच्या रुममध्ये आपल्या हातावर सुसाइड नोट लिहित आत्महत्या केली. आपल्याला शारिरीक आणि मानसिक अत्याचार केल्याने टोकाचे पाऊल उचलत असल्याचे तिने आपल्या सुसाइड नोटमध्ये म्हटले. ही घटना समोर आल्यानंतर संतापाची लाट उसळली. या प्रकरणातील दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली असून पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. मागील आठवड्यातील शुक्रवारी पहाटे पोलिसांनी प्रशांत बनकरला एका फार्महाऊसवर अटक केली. तर शनिवारी रात्री उशिरा गोपाल बदने याने पोलीस ठाण्यात स्वत:हून सरेंडर केले.
advertisement
पोलिसांच्या हाती सीसीटीव्ही फुटेज...
फलटणमधील महिला डॉक्टरने एका हॉटेलमध्ये गळफास घेत आत्महत्या केली. या हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागले आहे. त्यामुळे तपासात आणखी काही धागेदोरे मिळण्याची शक्यता आहे.
सीसीटीव्हीमध्ये काय?
पोलिसांना मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये ती महिला डॉक्टर दिसत असून ती एकटीच आहे. ती हॉटेलमधील
रुम क्रमांक ११४ मध्ये एकटीच गेली असल्याचेही दिसून आले आहे. रात्रीच्या सुमारास एकटीच या हॉटेलमध्ये कशी आली, नेमकं काय घडलं, या सगळ्याचाही तपास पोलिसांकडून सुरू आहे. पोलिसांकडून आता या फुटेजच्या आधारे आणि इतर माहितीच्या आधारे तांत्रिक विश्लेषण करण्यात येत आहे.