TRENDING:

'सातारा महिला डॉक्टरवर निंबाळकरांचा दबाव,आमच्या मुलीचा रिपोर्ट दिला खोटा', बावधनचं कुटुंब आलं समोर; मोठी खळबळ

Last Updated:

बनावट पोस्टमार्टम रिपोर्ट देण्यासाठी दबाव टाकला गेला होता, असा दावा या महिलेने केला आहे. त्यामुळे दीपाली निंबाळकर मृत्यू प्रकरण चर्चेत आले आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
सचिन जाधव, प्रतिनिधी
News18
News18
advertisement

सातारा : फलटण डॉक्टर तरुणीच्या मृत्यू प्रकरणात नवा गौप्यस्फोट करण्यात आला आहे. डॉक्टर तरुणीकडून तक्रारीत पोस्टपार्टम रिपोर्ट बदलण्यासाठी दबाव टाकला गेल्याचा उल्लेख होता. आथा साताऱ्यातीलच एक महिला समोर आली असून या महिलेने धक्कादायक दावा केला आहे. माझ्या मुलीचा मृत्यू नैसर्गिक नव्हता, पण त्यावर डॉक्टर तरुणीची सही होती. तिच्यावर बनावट पोस्टमार्टम रिपोर्ट देण्यासाठी दबाव टाकला गेला होता, असा दावा या महिलेने केला आहे. त्यामुळे दीपाली निंबाळकर मृत्यू प्रकरण चर्चेत आले आहे.

advertisement

आमच्या मुलीच्या आत्महत्येचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट चुकीचा असल्याची तक्रार साताऱ्यातील कुटुंबाने केली आहे. तिची आत्महत्या नाही तर खून असून तिच्या रिपोर्टवर डॉक्टर मुंडे यांची सही आहे. तसेच तिच्या सासरकडचे लोक हे निंबाळकर असून त्यांनीच हा रिपोर्ट बदलण्यासाठी दबाव टाकल्याचा दावा कुटुंबियांनी केला आहे. सातारा जिल्ह्यातील बावधन गावात राहणाऱ्या पांचांगणे या कुटुंबाने आज ॲडिशनल एसपी वैशाली कडुकर यांची भेट घेतली. तसेच आमच्या मुलीची आत्महत्या नाही तर खून झाल्याचा दावा त्यांनी केला आहे.

advertisement

माझ्या मुलीची आत्महत्या नाही तर हत्या, आईचा दावा

सातारा जिल्ह्यातीलच भाग्यश्री मारुती पांचगणे या महिलेने डॉक्टर तरुणीच्या मृत्यू प्रकरणानंतर हा दावा केला आहे. भाग्यश्री पांचगणे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, माझी मुलगी दीपाली हिचे लष्करात अधिकारी असलेल्या अजिंक्य हनुमंत निंबाळकर यांच्याशी लग्न झाले होते. 17 ऑगस्ट रोजी माझ्या जावयाने मला सांगितले की, दीपालीची प्रकृती गंभीर आहे. तिला फलटण येथील राऊत रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र आम्हाला सरकारी रुग्णालयात घेऊन गेले आणि मुलीने गळफास घेत आत्महत्या केल्याचे सांगितले. मात्र माझी मुलगी धाडसी आणि इंजिनिअर होती. गर्भवती असताना ती असे पाऊल उचलूच शकत नाही, तिची आत्महत्या नाही तर हत्या आहे.

advertisement

निंबाळकरांचा रिपोर्ट बदलण्यासाठी दबाव, कुटुंबाच्या आरोपाने मोठी खळबळ 

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
45 वर्षांपासून जपलीये तिच चव, सोलापुरातील फेमस शिक कढई, एकदा खाल तर पुन्हा याल
सर्व पहा

17 ऑगस्ट रोजी आमच्या मुलीनं आत्महत्या केली अशी बातमी आम्हाला मिळाली होती. आमच्या मुलीचा पोस्टमार्टम रिपोर्ट हा फलटण उपजिल्हा रुग्णालयात झाला होता. तेव्हा जो रिपोर्ट बनवण्यात आला होता तेव्हा आत्महत्या केलेल्या डॉक्टर यांनीच हा रिपोर्ट बनवला होता. त्यावेळी दिलेला हा रिपोर्ट चुकीचा दिला असून डॉक्टर महिला यांच्यावर समोरून राजकीय दबाव होता की काय अशी शंका त्यांनी यावेळी व्यक्त केली आहे आमच्या मुलीच्या सासरचं आडनाव निंबाळकर असून राजकीय दबाव त्यावेळीही दिला गेला असावा असा संशय आम्हाला आहे यामुळे पोलिसांनी याची कसून चौकशी करावी अशी मागणी कुटुंबाने केली आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
'सातारा महिला डॉक्टरवर निंबाळकरांचा दबाव,आमच्या मुलीचा रिपोर्ट दिला खोटा', बावधनचं कुटुंब आलं समोर; मोठी खळबळ
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल