TRENDING:

बांबू लागवडीसाठी मिळणार 7 लाखांचे अनुदान, विक्रीसाठी मार्केटही उपलब्ध होणार, नेमका कुठे अर्ज करावा?

Last Updated:

जे शेतकरी आपल्या शेतामध्ये बांबू लागवड करणार आहेत त्यांच्या बांबूंना महाराष्ट्रामध्येच मार्केट तयार करत आहे, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे यांनी दिली.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
शुभम बोडके
advertisement

सातारा : महाराष्ट्र शासनाकडून बांबू लागवड योजनेला प्रोत्साहन देण्यात येत आहे. बांबू लागवड करण्यासाठी शेतकऱ्यांना शासनाकडून अनुदानही देण्यात येत आहे. प्रत्येक बांबू लागवड करणाऱ्या शेतकऱ्यास 7 लाख रुपयांचा अनुदान देण्यात येत आहे. त्यामुळे पडीक आणि खडकाळ जमिनीवर बांबू लागवड करून शेतकऱ्यांना आर्थिक उन्नतीची संधी या निमित्ताने उपलब्ध झाली आहे.

सातारा जिल्ह्याचा विचार केला तर हजारो हेक्टर जमीन पडीक जमीन आहे. पूर्व भागांमध्ये किंवा पश्चिम भागामध्येही अशा पडीक जमिनी आहेत. सातारा जिल्ह्यात एकूण 27 हजार 500 हेक्टर बांबू लागवड करण्याचं उद्दिष्ट देण्यात आले आहे. सातारा जिल्ह्यात हजार एकर पडीक जमीन यावर बांबू लागवडीचे उद्दिष्ट निर्धारित करण्यात आले आहे. त्यासाठी जिल्हा परिषद, वन विभाग, सामाजिक वनीकरण, कृषी विभागाला हे उद्दिष्ट देण्यात आले आहे.

advertisement

हेक्टरी सरासरी 1111 बांबू रोपांची लागवड करावी लागणार आहे. 3 वर्षात शेतकऱ्यांना 7 लाख रुपयांचे अनुदान देण्यात येणार आहे. पहिल्या वर्षी 2.76 लाख रुपये, दुसऱ्या वर्षी 1.56 लाख रुपये आणि तिसऱ्या वर्षी उर्वरित रक्कम अनुदान देण्यात येणार आहे. बांबू लागवडीसाठी शासन शेतकऱ्यांना चांगले अनुदान देत आहे. पण जमिनी अथवा शेत बांधावर देखील शेतकरी बांबू लागवड करून आर्थिक उत्पन्न मिळवू शकतो. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्याची पडीक जमीन सुद्धा लागवडीखाली येत आहे. शिवाय शेतकऱ्यांचा आर्थिक फायदाही होणार आहे. या सर्व प्रकारच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी आपल्याला कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक मंडळ, कृषी अधिकारी किंवा तालुका कृषी अधिकारी यांच्या कार्यालयामध्ये संपर्क करावा.

advertisement

मित्रांच्या मदतीने पापड उद्योग सुरू, सुरुवातीला तोटा, पण पुन्हा उभारी, आज 180 महिलांना मिळतोय रोजगार

बांबू लागवडीसाठीचे निकष काय -

बांबू शेती अनुदान मिळवण्यासाठी शेतीचा सातबारा गाव नमुना आठ अ उतारा, अर्जासह गाव नकाशा प्रत, रहिवासी दाखला बांबू लागवड क्षेत्रात ठिबक सिंचनाची सुविधा असावी. याशिवाय ज्या क्षेत्रात बांबू लागवड करायचे आहे, त्या क्षेत्राला रोपांच्या संरक्षणासाठी शेताला तारेचे कुंपण असणे आवश्यक आहे. बांबू लागवड करणाऱ्या शेतकऱ्याने 4 वर्षांपर्यंत त्या रोपाचे संगोपन करून त्याचे आवश्यक ती काळजी घेणे गरजेचे आहे. बांबू लागवड केल्यानंतर संबंधित विभाग वेळोवेळी रोपांची पाहणी करण्यासाठी शेतकऱ्यांच्या शेतावर किंवा पडीक रानावर येणार आहे.

advertisement

नेमकी योजना काय -

ज्या शेतकऱ्यांना बांबू लागवड करायची आहे त्या शेतकऱ्यांना बांबू लागवडीचा प्रस्ताव तयार करून ग्राम रोजगार सेवकामार्फत आणि ग्रामपंचायतीचा ठराव घेऊन पंचायत समितीला सादर करावा लागणार आहे. प्रस्ताव मंजूर झाल्यावर त्याचे संमतीपत्र घेऊन शासनाने निर्धारित केलेल्या नर्सरीमधूनच रोपे खरेदी करावी लागणार आहेत. या रोपांची लागवड 15X15 या अंतराने करावी लागणार आहेत. यानंतर टप्प्याटप्प्याने हे अनुदान शेतकऱ्यांना 3 वर्षात देण्यात येणार आहे.

advertisement

मोटार सायकलला हवाय पसंतीचा क्रमांक, तर ही सुवर्णसंधी सोडू नका, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

त्याचबरोबर प्रशासन फक्त योजनेचा लाभ देऊन थांबणार नाही तर भविष्य काळामध्ये इंधनाच्या वापरासाठीचा वापर करण्यासाठी बांबूंचे डेपो तयार करणे, त्याच पद्धतीने बांबूंचे इंधन वापरासाठीचे कारखाने तयार करण्यासाठी महाराष्ट्र शासन प्रयत्न करत आहे. जे शेतकरी आपल्या शेतामध्ये बांबू लागवड करणार आहेत त्यांच्या बांबूंना महाराष्ट्रामध्येच मार्केट तयार करत आहे, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे यांनी दिली.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/सातारा/
बांबू लागवडीसाठी मिळणार 7 लाखांचे अनुदान, विक्रीसाठी मार्केटही उपलब्ध होणार, नेमका कुठे अर्ज करावा?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल