भारताच्या इतिहासात आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आणि अभिमानास्पद आहे. 16 जानेवारी 1681 रोजी छत्रपती संभाजीराजे यांचा छत्रपती म्हणून राज्याभिषेक झाला होता. वयाच्या 32व्या वर्षी 128 युद्ध जिंकणाऱ्या छत्रपती संभाजी महाराज यांचा राज्याभिषेक हा खरोखर इतिहासातला सुवर्ण प्रसंग आहे.
अयोध्येत दरवळणार 108 फूट अगरबत्तीचा सुगंध
advertisement
या घटनेचा सोहळा म्हणून आज साताऱ्याला दरवर्षीप्रमाणे एखाद्या सणाचं रूप आलं होतं. तमाम शिवप्रेमी आणि छत्रपतींच्या थेट वंशजांनी ढोल ताशांच्या गजरात छत्रपती संभाजी महाराजांची मिरवणूक किल्ले अजिंक्यताराच्या महाद्वारापासून काढली. त्यानंतर अजिंक्यतारावर अत्यंत नेत्रदिपक असा राज्याभिषेक सोहळा पार पडला.
सात नद्यांच्या पाण्याने केला राज्याभिषेक
किल्ले अजिंक्यतारावर छत्रपती संभाजीराजे महाराजांच्या मूर्तीला सात नद्यांच्या पाण्याचा अभिषेक करण्यात आला. छत्रपतींच्या वंशज वृषालीराजे भोसले यांच्या हस्ते हा राज्याभिषेक पार पडला. दरम्यान, संभाजी महाराज हे वयाच्या अठराव्या वर्षी युवराज आणि तेविसाव्या वर्षी छत्रपती झाले. किल्ले रायगडावर त्यांचा राज्याभिषेक सोहळा पार पडला होता. आपल्या कारकिर्दीत ते 201 लढाया लढले. त्यापैकी एकाही लढाईत त्यांचा पराभव झाला नव्हता. कारण त्यांनी स्वराज्यासाठी आपलं सर्वस्व अर्पण केलं होतं. रयतेसमोर त्यांनी स्वराज्य आणि स्वधर्माचा आदर्श घालून दिला होता. अशा थोर राजाला मानाचा मुजरा!!!
लेटेस्ट बातम्या आणि व्हिडीओ पाहण्यासाठी न्यूज18 लोकमतच्या या अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनलला करा फॉलो...या लिंकवर क्लिक करा https://whatsapp.com/channel/0029Va7W4sJI7BeETxLN6L0g