TRENDING:

दुष्काळी पट्ट्यात डाळिंबाची लागवड, शेतकऱ्यानं कमालंच केली, 2 एकर मधून घेतलं लाखो रुपयांचं उत्पन्न

Last Updated:

त्यांनी नव्या युगाच्या अस्सल, प्रगतशील शेतकऱ्याच्या नजरेतून विषम वातावरणातील प्रतिकूल बदलांचा वेध घेतला. आधुनिक शेती तंत्रज्ञानाच्या आणि सेंद्रिय शेतीच्या जोरावर, पाण्याची कमतरता असतानाही दोन एकर क्षेत्रामध्ये ड्रीपच्या सहाय्याने पाण्याची नियोजन केले.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
शुभम बोडके, प्रतिनिधी
advertisement

सातारा : सध्या अनेक शेतकरी हे पारंपरिक शेतीच्या तुलनेत विविध पिकांच्या माध्यमातून चांगली कमाई करत आहे. अशाच एका शेतकऱ्याने डाळिंबाच्या शेतीतून लाखो रुपयांचे उत्पन्न घेतले आहे. नेमके कोण आहे हे शेतकरी जाणून घेऊयात, त्यांची यशस्वी कहाणी.

संतोष धुमाळ असे या शेतकऱ्याचे नाव आहे. ते सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील धुमाळवाडी येथील रहिवासी आहेत. डाळिंब लागवडीमुळे ते आज लाखो रुपयांची वार्षिक उलाढाल करत आहेत. धुमाळवाडी हे गाव फळांचे गाव म्हणून प्रसिद्ध आहे. एका वर्षाकाठी या गावातून करोडो रुपयांची फळांची विक्री ही शेताच्या बांधावरून होते. यामुळेच हे गाव आता आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी बनले आहे. धुमाळवाडीतील 90 टक्क्यांहून अधिक बागायतदारांनी आपल्या शेतीच्या जोरावर दुमजली बंगले बांधले आहेत.

advertisement

शेतकऱ्याच्या मुलीच्या गाण्याची पंतप्रधान मोदींना भुरळ, सोशल मीडियावर व्हिडिओ केला शेअर, गायिका म्हणाली...

गेल्या अनेक वर्षांपासून पारंपारिक पद्धतीने धुमाळवाडी मध्ये शेती केली जात होती. मात्र, युवा शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये फळबागेची लागवड करण्याचा निर्णय घेतला आणि फळं शेतीमधून कमालीचे उत्पन्न मिळवून लखपती झाले आहेत. संतोष धुमाळ यांनीही डोंगराळ भागांमध्ये आपल्या दोन एकर क्षेत्रात डाळिंबाची बागेची लागवड केली आहे.

advertisement

त्यांनी नव्या युगाच्या अस्सल, प्रगतशील शेतकऱ्याच्या नजरेतून विषम वातावरणातील प्रतिकूल बदलांचा वेध घेतला. आधुनिक शेती तंत्रज्ञानाच्या आणि सेंद्रिय शेतीच्या जोरावर, पाण्याची कमतरता असतानाही दोन एकर क्षेत्रामध्ये ड्रीपच्या सहाय्याने पाण्याची नियोजन केले. उन्हापासून डाळिंबाचे संरक्षण व्हावे, यासाठी नेटचा वापर केला. अशा पद्धतीने यावर्षी त्यांनी डाळिंबाच्या पिकातून लाखो रुपयांचे उत्पादन घेतले आहे. डाळिंबाची लागवड करताना जैविक शेतीचा अवलंबन मोठ्या प्रमाणावर केला असल्याची माहिती त्यांनी दिली.

advertisement

त्यांनी दोन एकर क्षेत्रामध्ये 500 झाडांची लागवड केली आहे. या क्षेत्रामधून सरासरी 8 ते 10 टन एवढे उत्पादन मिळणार असल्याचा अंदाज त्यांनी वर्तवला आहे. सरासरी 120 ते 125 रुपये डाळिंबाला प्रति किलो दर मिळाला तरी सरासरी 10 ते 12 लाख रुपये उत्पन्न मिळू शकते, असे ते म्हणाले.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/सातारा/
दुष्काळी पट्ट्यात डाळिंबाची लागवड, शेतकऱ्यानं कमालंच केली, 2 एकर मधून घेतलं लाखो रुपयांचं उत्पन्न
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल