TRENDING:

Satara Accident: आईचा हेल्मेटसाठी आग्रह, दीड तासांत खणाणला फोनं, अन्....

Last Updated:

Satara Accident: आईनं मुलाला हेल्मेट घालण्याचा आग्रह केला आणि काही वेळातच मुलाचा अपघात झाला. त्यामुळे मुलाचा जीव वाचला.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
सातारा: आई आणि मुलाचं नातं हे प्रेम, कळकळ, सहानुभूती आणि प्रेमाच्या भावनिक बंधांनी जोडलेलं असतं. कोणतंही मुल हे आई जवळ असलं स्वत:ला सुरक्षित मानतं. तसंच मुल कितीही मोठं झालं तरी आईसाठी ते मुलच असतं. त्यामुळे कोणतीही आई आपल्या पोटच्या गोळ्याला जीवापाड जपत असते. साताऱ्यात नुकताच दुचाकी अपघात झाला आणि यातून याच गोष्टीचा प्रत्यय आला. आईच्या आग्रहामुळं मुलानं हेल्मेट घातलं आणि त्यामुळेच 24 वर्षीय मुलाचा जीव वाचला आहे.
आईचा हेल्मेटसाठी आग्रह अन् दीड तासांत खणाणला फोनं, मुलाचा अपघात झालाय...
आईचा हेल्मेटसाठी आग्रह अन् दीड तासांत खणाणला फोनं, मुलाचा अपघात झालाय...
advertisement

साताऱ्यातील मोळाचा ओढा परिसरात मन हेलावून टाकणारी ही घटना घडली. 24 वर्षीय सूरज जाधव मुलाखतीचा कॉल आल्याने दुचाकीवरून मित्रासह पुण्याला निघाला होता. रस्त्यातच दुचाकीचा भीषण अपघात झाला. यामध्ये सुरजने हेल्मेट घातल्ये त्याचा जीव वाचला. मात्र, त्याचा मित्र पिंटू उर्फ राजेश शिंदे हा डोक्याला मार लागल्याने कोमात गेला आहे.

पुण्याची इभ्रत महत्त्वाची की 'ती'ची? स्वारगेट बलात्कार पीडितेची रिअल कहाणी, संपूर्ण जबाब

advertisement

आईमुळे वाचला जीव

सुरज पुण्याला निघाला जात असताना आईने हेल्मेट घेऊन जाण्याचा आग्रह केला. परंतु, सुरजने दूर्लक्ष केलं आणि तो तसाच निघून गेला. आईला घरात हेल्मेट दिसल्यानंतर त्यांनी मुलाला फोन केला आणि एका हातात हेल्मेट घेऊन फोनवर बोलतच त्या चौथ्या मजल्यावरून पायऱ्या उतरत खाली आल्या. “तू कुठे असेल तिथे थांब. परत ये आणि हेल्मेट घेऊन जा”, असा आग्रह केला. तसेच “परत न आल्यास तू जिथंपर्यंत गेलास तिथंपर्यंत मी हेल्मेट घेऊन चालत येते” अशी भूमिका त्यांनी घेतली. आईचा आग्रह ऐकून सूरज परत आला आणि हेल्मेट घेऊन गेला.

advertisement

दीड तासांतच फोन

सूरज पुढे गेल्यानंतर दीड तासातच आईचा फोन खणाणला. “तुमच्या मुलाचा अपघात झालाय. दोघांनाही पुण्याला हलवलंय,” हे शब्द ऐकताच आईच्या काळजाचा ठोका चुकला. शेजाऱ्यांना सोबत घेऊन ती बसने पुण्याला निघाली. बसमध्ये असतानाच मुलगा सूरजचा फोन आला. “आई, मी सूरज बोलतोय. आमचा अपघात झालाय. मी ठीक आहे, पण पिंटूला खूप लागलंय. त्याला पुण्याला ॲडमिट केलंय. आई तू दिलेल्या हेल्मेटमुळं मला काहीही झालेलं नाही..” असं सूरजनं सांगितलं. हे ऐकताच आईच्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहू लागले.

advertisement

दरम्यान, आईनं आग्रहानं हेल्मेट दिल्यानंतर काही वेळातच अपघात झाला. त्यामुळे अपघात होणार याची आईला आधीच हुरहुल लागली आणि तसंच झालं, असं बोललं जातंय. हेल्मेट घालणारा सूरज वाचला आणि न घातलेला मित्र कोमात गेला.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/सातारा/
Satara Accident: आईचा हेल्मेटसाठी आग्रह, दीड तासांत खणाणला फोनं, अन्....
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल