सातारा : महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्याला ऐतिहासिक वासरा लाभलेला आहे. शिवकाळात वाईलाही मोठा इतिहास आहे. वाईमध्ये राहणारे इतिहास अभ्यासक प्रसाद बनकर यांनी शिवकालीन शस्त्रांचा संग्रह करण्याचा छंद जोपासला आहे. या शस्त्रसंग्रहात वाघनखे देखील आहेत. या संग्रहातून शिवकालीन इतिहास जाणून घेण्यास मदत होतेय.
ऐतिहासिक 19 वाघनखाचा संग्रह
प्रसाद बनकर यांनी 22 वर्षापासून शस्त्रांचा संग्रह आणि त्याचे संवर्धन करण्याचा छंद जोपासला आहे. त्यांच्याकडे शिवकालीन तलवार, भाले, वाघनखे, दांडपट्टे, ब्रिटिश कालीन तलवारी, बंदुका अश्या हजारो शस्त्रांचा संग्रह आहे. त्यांच्याकडे एक नखी, दोन नखी, तीन नखी, चार नखी, आठ नखी अशी एकूण अस्सल ऐतिहासिक 19 वाघनखाचा संग्रह आहे.
advertisement
या नवाबाचा मृतदेह कबरीतून आला होता बाहेर? काय आहे ही आश्चर्यकारक कहाणी
इसवीसन 16 व्या शतकापासून ते 18 व्या शतकाच्या अखेरी पर्यंतची ही सर्व वाघनखे आहेत. ही सर्व वाघनखे हँडमेड म्हणजे हातावर बनवलेली आहेत. अत्यंत दुर्मिळ आणि खूप सुंदर कंडिशनमध्ये ही सर्व वाघनखे आहेत. या वाघनखांच्या ब्लेडची/पात्याची लांबी सर्वसाधारणपणे 2 ते 2.5 इंच आहे. या सर्वांमध्ये सुंदर म्हणजे 8 नखी वाघनख जे आहे त्यावर सुंदर हाताने कोरलेली मीना वर्क केलेली डिझाईन आहे आणि त्या डिझाईनमध्ये सोने म्हणजेच गोल्ड भरलेले आहे. तसेच काही चार नखी वाघनखांना चांदीच्या अंगठ्या बसवलेल्या आहेत. तर काही वाघनख ही पितळेच्या पट्टीवर बसवलेली आहेत,असं इतिहास अभ्यासक प्रसाद बनकर सांगतात.
भारताच्या या गावात संविधान लागू होत नाही, कुठे आहे हे गाव?
ही सर्व वाघनखे अत्यंत सुंदर आणि दुर्मिळ प्रकारातील असून गेली 22 वर्षे प्रसाद बनकर ही सर्व वाघनखे त्यांच्या शिवकालीन शस्त्रास्त्रांच्या संग्रहामध्ये जमवत आहेत. अशा दुर्मिळ वाघनखांचा साठा प्रसाद बनकर यांच्या शिवकालीन शस्त्रास्त्रांमध्ये अत्यंत व्यवस्थितरीत्या जतन करून ठेवण्यात आलेला आहे.