TRENDING:

Satara Lok Sabha Result 2024 : साताऱ्यात तुतारी पडली मागे, उदयनराजेंची जोरदार आघाडी

Last Updated:

Satara Lok Sabha Result 2024 : साताऱ्यात भाजपकडून खासदार उदयनराजे भोसले तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
सातारा : लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून निकालाचे पहिले कल हाती येत आहेत. पोस्टल मतदानाची मोजणी पहिल्यांदा होत आहे. यात साताऱ्यात भाजपचे उमेदवार खासदार उदयनराजे भोसले आघाडीवर आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार शशिकांत शिंदे हे पिछाडीवर आहेत. देशात पहिला कल हाती आला असून यात भाजप दीडशेपेक्षा जास्त जागांवर आघाडीवर असून इंडिया आघाडी ७८ जागांवर पुढे आहे. यात काँग्रेसला २९ जागा असल्याचं दिसून येतंय.
News18
News18
advertisement

साताऱ्यात भाजपकडून खासदार उदयनराजे भोसले तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत आहे. विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील यांनी प्रकृती अस्वास्थ्यामुळे निवड़णूक न लढण्याचा निर्णय घेतल्यानंतर या ठिकाणी शरद पवार यांनी शशिकांत शिंदे यांना उमेदवारी दिली.

Loksabha Election Results 2024 : एकनाथ शिंदेंना होम ग्राऊंडवर धक्का, ठाण्यात ठाकरे गटाची आघाडी

advertisement

साताऱ्यात दोन्ही उमेदवारांची प्रतिष्ठा पणाला

राष्ट्रावादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीनंतर साताऱ्याची जागा राखण्याचं आव्हान शरद पवार यांच्यासमोर आहे. उदयनराजे यांनी भाजपचं कमळ हाती धरल्यानंतर श्रीनिवास पाटील यांना उभा करून उदयनराजेंना पराभवाचा धक्का दिला होता. त्यानंतर भाजपने उदयनराजे यांना राज्यसभेवर पाठवलं. राज्यसभेचा कार्यकाळ अद्याप शिल्लक असतानाही उदयनराजे यांना भाजपने लोकसभेच्या मैदानात उतरवलंय.

advertisement

२०१९ च्या पोटनिवडणुकीत उदयनराजे भोसले यांचा पराभव झाला होता. तर शशिकांत शिंदे यांचा विधानसभा निवडणुकीत पराभव झाला होता. त्यामुळे दोन्ही उमेदवारांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरलीय.

उदयनराजे यांच्यासाठी साताऱ्यात कराडमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा झाली. उदयनराजेंना अखेरच्या क्षणी उमेदवारी जाहीर झाली होती. सातारा लोकसभा मतदारसंघात एकूण मतदानाच्या ६३.१६ टक्के इतकं मतदान झालं आहे. साताऱ्यात एकूण मतदान १८ लाख ८९ हजार ७४० इतकं असून ११ लाख ९३ हजार ४९२ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावलाय. साताऱ्यात २३ फेरीत मतजमोजणी होणार आहे. सायंकळी सहा ते सात वाजेपर्यंत निकाल जाहीर होईल यासाठी प्रशासनाकडून तयारी करण्यात येत आहे. सातारा लोकसभा मतदारसंघात ७ मे रोजी मतदान झाले.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/सातारा/
Satara Lok Sabha Result 2024 : साताऱ्यात तुतारी पडली मागे, उदयनराजेंची जोरदार आघाडी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल