TRENDING:

‘टोमॅटो आमचा, दरही आमचा, विक्रीही शेतकऱ्याच्या बांधावरच', महाराष्ट्रातील अनोखं गाव, कोट्यवधींची उलाढाल

Last Updated:

या गावामध्ये प्रगतशील शेतकरी मोठ्या प्रमाणात टोमॅटोचे उत्पादन घेतात. या गावांमधून रोज भाजीपाल्याचे, टोमॅटोचे अनेक ट्रक मुंबई, वाशी, पुण्यासह इतर बाजारात जातात. यामध्ये टोमॅटो पिकाचा वाटा लक्षणीय आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
शुभम बोडके, प्रतिनिधी
advertisement

सातारा : सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यात असणाऱ्या तडवळे गावातील टोमॅटो उत्पादकांनी ‘टोमॅटो आमचा, दरही आमचाच..!’ आणि विक्री ही शेताच्या बांधावरूनच असा संकल्प बांधत टोमॅटो विक्री सुरू केली आहे. सध्या तडवळे गावातील शेतकरी एकत्रितपणे मुंबई, पुण्याच्या बाजार समितीतील घाऊक व्यापाऱ्यांशी बोलून आपला दर ठरवतात आणि त्यानुसारच व्यवहार करतात. त्यामुळेच तडवळे गावाला टोमॅटोचे गाव म्हणून ओळखले जाऊ लागले आहे. या शेतकऱ्यांची ही एकी आणि त्यांच्या या उपक्रमाची सध्या सातारसह संपूर्ण महाराष्ट्रभर चर्चा सुरू झाले आहे. ही नेमकी संकल्पना काय आहे, हे आपण जाणून घेऊयात.

advertisement

साताऱ्यातील कोरेगाव तालुक्यातील तडवळे गाव बागायती शेत जमिनीचे गाव म्हणून ओळखले जाते. या गावामध्ये प्रगतशील शेतकरी मोठ्या प्रमाणात टोमॅटोचे उत्पादन घेतात. या गावांमधून रोज भाजीपाल्याचे, टोमॅटोचे अनेक ट्रक मुंबई, वाशी, पुण्यासह इतर बाजारात जातात. यामध्ये टोमॅटो पिकाचा वाटा लक्षणीय आहे.

Friendship Day 2024 : या ‘फ्रेंडशिप डे’ला बनवा घरच्या घरी बॅण्ड, फारच सोपी आहे पद्धत, VIDEO

advertisement

View More

तडवळे गाव टोमॅटोचे गाव म्हणून प्रसिद्ध -

सातारा जिल्ह्यातील तडवळे गाव हे टोमॅटोचे गाव म्हणून महाराष्ट्रात प्रसिद्ध झाले आहे. या गावात 200 एकरहून अधिक एकरवर टोमॅटोची लागवड केली जाते. या गावातील घरटी टोमॅटोची शेती केली जाते. ही टोमॅटोची शेती युवा शेतकरी एकत्र मिळून करतात. सरासरी गावांमध्ये 80 ते 90 टक्के तडवळे ग्रामस्थ हे टोमॅटोचे पीक घेतात. तडवळे गावाचे प्रमुख पीक म्हणूनच टोमॅटोची ओळख सर्व पंचक्रोशीमध्ये आहे.

advertisement

इतर पिकाच्या तुलनेत कमी कालावधीमध्ये जास्त उत्पादन या टोमॅटोच्या शेतीमधून होत असल्याने गावात सर्वत्र टोमॅटोची शेती केली जाते. युवा तरुण नोकरीला न जाता आपल्या शेतात टोमॅटोची लागवड करून वर्षभरात नोकरी करून जेवढे पैसे कमवू शकतात, त्यापेक्षा जास्त पैसे हे या टोमॅटोच्या शेतीतून कमवत असल्याचे देखील युवा प्रगतशील शेतकरी सचिन झांजुर्णे यांनी सांगितले.

advertisement

फक्त 120 रुपयांपासून सुंदर अशी तांबे-पितळाची जेवणाची भांडी, दादरमधील दाम्पत्याच्या दुकानाची सर्वत्र चर्चा

2000 सालापासून बाहेरून व्यापारी वर्ग त्याचबरोबर भैय्या हे तडावळे गावात येतात. प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन मालाचा दर्जा पाहून शेतकऱ्याच्या बांधावरच टोमॅटोचा दर निश्चित केला जातो. मुंबई, वाशी पुण्यासह इतर बाजारपेठेमध्ये टोमॅटोचा भाव काय आहे, याची सरासरी लक्षात घेत हा दर निश्चित केला जातो. प्रत्येक टोमॅटो उत्पादकाच्या शेतावर जाऊन एकच दर या गावाच्या एकत्रित शेती करण्यामुळे सर्वांना मिळतो.

टोमॅटो आमचा, दरही आमचा, विक्रीही शेतकऱ्याच्या बांधावरच असा संकल्प तडावळे ग्रामस्थांनी केला आहे.

24 वर्षांपासून या गावांमध्ये फक्त टोमॅटोची शेती हे प्रमुख पीक घेतले जात आहे. यामाध्यमातून तडवळे गावातून वर्षाला हजारो टन टोमॅटोची विक्री केली जाते. या टोमॅटोच्या विक्रमी विक्रीमधून सरासरी तडवळे गावात 10 ते 15 कोटींची उलाढाल होत असल्याचेही ग्रामस्थांनी सांगितले.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/सातारा/
‘टोमॅटो आमचा, दरही आमचा, विक्रीही शेतकऱ्याच्या बांधावरच', महाराष्ट्रातील अनोखं गाव, कोट्यवधींची उलाढाल
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल