ऐन निवडणुकीच्या धामधुमीत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आल्याने चर्चांना उधाण आले आहे. विद्यमान उपमुख्यमंत्री आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांना सध्या झेड प्लस सुरक्षा व्यवस्था आहे. पण, आता त्यात वाढ करण्यात आली आहे. फडणवीस यांच्या सुरक्षा व्यवस्थेतही वाढ करण्यात आली आहे. फडणवीस यांना असलेल्या धोक्यानंतर
advertisement
फडणवीस यांची सुरक्षा व्यवस्था कशी असणार?
देवेंद्र फडणवीस यांच्या सुरक्षा व्यवस्थेत सध्या फोर्स 1 मधील अत्याधुनिक शस्त्रधारी असलेले 4 कमांडो तैनात असणार आहे. एकूण 18 जवान एका वेळी सुरक्षेसाठी तैनात असणार आहेत. गनमॅनच्या संख्येत वाढ करण्यात आली आहे.
फडणवीसांच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ का?
एसआयडीच्या गोपनीय रिपोर्टमुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सुरक्षा अलर्टवर आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या जीवाला धोका असल्याने ही सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
