अजित पवारांना सर्वसामान्य लोकांच्या प्रश्नांची सखोल माहिती. गेली अनेक वर्ष संघटनेची कामं करत होते. लोकांना न्याय देण्याचं काम ते करत होते. आज हयात असते तर घरी दिसले नसते. नरेश अरोरा कोण हे मलासुद्धा माहिती नाही. जे गेले त्यांना परत आणू शकत नाही. सध्याच्या स्थितीचा सामना करणं हे आव्हानात्मक आहे. कुणी ना कुणी अजित पवारांची जबाबदारी घेतली पाहिजे. सुनेत्रा आणि रोहितला मंत्रिपदावर घेण्यासंबंधी माहिती नाही.
advertisement
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का?
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार याची चार महिन्यांपासून चर्चा सुरू होती. जयंत पाटील आणि अजित पवार यांच्यात विलीनीकरणाची चर्चा झाली. विलीनीकरणाच्या चर्चेत आता खंड पडलेला दिसतोय. दोन राष्ट्रवादी एकत्र व्हाव्यात ही दादांची इच्छा होती. 12 तारखेला विलीनीकरणाचा निर्णय जाहीर करायचा होता. कोर्टातली केसही मागे घेण्यासंदर्भात चर्चा सुरू होती. त्यांची ही इच्छा पूर्ण व्हावी अशी आमची इच्छा आहे असं शरद पवार म्हणाले.
अजित पवार यांचा अपघात बारामतीमध्ये टेक्निकल फाउलरमुळे झाला का?
तो अपघात होता, अपघात झाला त्यात टेक्निकल फाउल काय? चौकशीनंतर बाकी गोष्टी समोर येतील. त्याचं राजकारण करू नये.
राष्ट्रवादीचे निर्णय भाजप घेतंय का? शरद पवारांनी दोन शब्दांत दिलं उत्तर
सुनेत्रा पवार यांच्या उपमुख्यमंत्रीपदासाठी पवार कुटुंबियांचा पाठिंबा आहे का?
अस्थी विसर्जनानंतर सुनेत्रा पवार यांच्याशी कोणताही संपर्क किंवा संवाद झाला नाही. कुटुंबातल्या कुणाशीही संवाद न साधता त्या थेट मुंबईत आल्या, आज त्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असल्याची माहिती मिळाली आहे. अजित पवार यांच्या पक्षाची धुरा त्यांच्या अकाली निधनानंतर आता सुनेत्रा पवार सांभाळणार आहेत.
अजितदादांचा राष्ट्रवादी पक्ष भाजपकडून घेतले जात आहेत का?
सुनेत्रा पवार शपथ घेणार याची माहिती नाही. सुनेत्रा पवार यांची निवड केली जावी ही मागणी त्यांच्या पक्षातून होत आहे. प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी हा निर्णय घेतला असावा. त्यांच्या पक्षाची ती पद्धत असावी, बाकी मला याबाबत माहिती नाही. आमच्याशी कोणतीही चर्चा किंवा याबाबत संवाद झालेला नाही.
रोहितला मंत्रिपदावर घेणार का?
रोहित पवारांना मंत्रिपदावर घेणार का याबाबत सध्या माझ्यापर्यंत कोणतीही माहिती आलेली नाही. याबद्दल आमच्या पक्षात अशी कोणतीही चर्चा झाली नाही. त्यांच्या पक्षाची वाटचाल ही स्वतंत्र असेल हे त्यांनी स्पष्ट केलं आहे.
राष्ट्रवादी पक्षाकडून इतके घाईत निर्णय का घेतंय?
सुनेत्रांच्या निवडीची मागणी त्यांच्या पक्षातून होत आहे. त्यांनी इतक्या वेगानं का घेतला हे कळलं नाही असं देखील ते म्हणाले. अजित पवारांच्या पक्षाची पद्धत असेल म्हणून तसे निर्णय होतात. कुणी तरी जबाबदारी घेतली पाहिजे म्हणून निर्णय घेतले जात असावेत.
शरद पवार यांनी (शरद पवार गट) धुरा कुणाकडे सोपवली?
जयंत पाटील अजित पवार यांच्यासोबत सगळ्या चर्चा करत होते. त्यामुळे आता जयंत पाटील यांच्याकडे नकळत सगळी महत्त्वाची धुरा देण्यात आल्याचे सूचक संकेत शरद पवार यांनी दिले आहेत.
दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणात शरद पवार यांची महत्त्वाची भूमिका होती का?
मी त्या प्रक्रियेतही नाहीय. दादांची इच्छा पूर्ण व्हावी हे आमची इच्छा आहे. राष्ट्रवादीचे निर्णय भाजप घेतंय का हे माहिती नाही. विलीनीकरणाच्या चर्चेत मी कुठेच सहभागी नव्हतो.
