advertisement

राष्ट्रवादीचे निर्णय भाजप घेतंय का? शरद पवारांनी दोन शब्दांत दिलं उत्तर

Last Updated:

Maharashtra Politics : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं २८ जानेवारीला विमान अपघातात निधन झालं. अजित पवार गेल्यानंतर राष्ट्रवादी पक्षाची धुरा आणि वाटचाल कशी असणार? याबाबतच्या चर्चा सुरू झाल्या होत्या.

sharad pawar on bjp
sharad pawar on bjp
मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं २८ जानेवारीला विमान अपघातात निधन झालं. अजित पवार गेल्यानंतर राष्ट्रवादी पक्षाची धुरा आणि वाटचाल कशी असणार? याबाबतच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. अखेर सुनेत्रा पवार आज संध्याकाळी ५ वाजता या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. असून राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची जबाबदारी देखील त्यांच्याकडे देण्यात येणार आहे. अशी माहिती समोर आली आहे. दुसरीकडे शरद पवार यांची पत्रकार परिषद पार पडली असून त्यांनी देखील या घडामोडींवर प्रतिक्रिया दिली आहे.
शपथविधीबाबत कोणतीही घाई नाही
शरद पवार यांनी स्पष्ट केले की, सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीबाबत आपण कोणतीही घाई केलेली नाही. या संदर्भात सुनेत्रा पवार यांच्याशी आपली कोणतीही चर्चा झालेली नसल्याचेही त्यांनी सांगितले. अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यात पक्ष विलीनीकरणासंदर्भात चर्चा सुरू होती आणि त्या प्रक्रियेची संपूर्ण जबाबदारी अजित पवारांकडे होती. मात्र, सध्या त्या प्रक्रियेत खंड पडल्याचे त्यांनी नमूद केले. तरीही अजित पवार यांची एकत्रीकरणाची इच्छा पूर्ण व्हावी, अशी आपली अपेक्षा असल्याचे शरद पवार म्हणाले.
advertisement
विलीनीकरणासाठी संवादाची भूमिका कायम
शरद पवार पुढे म्हणाले की, अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील एकत्रीकरणाची भूमिका यशस्वी व्हावी, हीच आमची इच्छा आहे. गेल्या चार महिन्यांपासून यासंदर्भातील चर्चा सुरू होती. पुढील काळात या विषयावर कोण पुढाकार घेणार, हे ठरेल. दोन्ही पक्षांमध्ये संवाद कायम राहावा, यासाठी आम्ही नेहमीच सकारात्मक भूमिका घेतली आहे. विलीनीकरणाबाबतचा निर्णय १२ तारखेला जाहीर करण्याचा विचार होता. त्या चर्चेत मी स्वतः सहभागी नव्हतो, मात्र जयंत पाटील आणि अजित पवार यांच्यात सविस्तर चर्चा झाली होती, असेही त्यांनी स्पष्ट केले.
advertisement
भाजपबद्दल पवार काय म्हणाले?
भाजपच राष्ट्रवादी पक्ष चालवणार अशा चर्चा रंगल्या होत्या.यावर देखील शरद पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, हे मला काही माहीत नाही, या फक्त चर्चा आहेत.आमच्या मनात तसं नाही असं उत्तर शतड पवार यांनी दिलं.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
राष्ट्रवादीचे निर्णय भाजप घेतंय का? शरद पवारांनी दोन शब्दांत दिलं उत्तर
Next Article
advertisement
अजितदादांचा विमान अपघात: हा निव्वळ दुर्दैव की व्यवस्थेने केलेला घात; बारामतीच्या रनवेवर त्या दिवशी नेमकं काय घडलं?
अजितदादांचा विमान अपघात: हा निव्वळ दुर्दैव की व्यवस्थेने केलेला घात
  • बारामती अपघात हा शेवटचा इशारा

  • विमान वाहतूक सुरक्षेचे 'ऑडिट' आता तरी होणार का?

  • अजित पवारांचा अंत आणि उडालेली सुरक्षा यंत्रणा

View All
advertisement